महाराष्ट्र

maharashtra

Dasara Melava : पालिकेने नाकारली दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटांना परवानगी, 'हे' आहे कारण...

By

Published : Sep 22, 2022, 12:42 PM IST

Updated : Sep 22, 2022, 2:11 PM IST

शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी दादर शिवाजी पार्क येथे होतो. शिवसेनेत फूट पडल्यावर ठाकरे आणि शिंदे गटाकडून दसरा मेळावा साजरा करण्यास परवानगी द्यावी, असा अर्ज पालिकेकडे केला होता. पालिकेने कोणालाही परवानगी दिली नसल्याने ठाकरे गटाने उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. याच दरम्यान मुंबई महापालिकेने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न (denied permission due to citing law and order) असल्याने दोन्ही गटाला परवानगी नाकारली (municipality denied permission to Dasara Melava) आहे. तसे पत्र पालिकेने दोन्ही गटांना दिले आहे. दसरा मेळावा

Dasara Melava
दसरा मेळावा

मुंबई :शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी दादर शिवाजी पार्क येथे होतो. शिवसेनेत फूट पडल्यावर ठाकरे आणि शिंदे गटाकडून दसरा मेळावा साजरा करण्यास परवानगी द्यावी, असा अर्ज पालिकेकडे केला होता. पालिकेने कोणालाही परवानगी दिली नसल्याने ठाकरे गटाने उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. याच दरम्यान मुंबई महापालिकेने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न (denied permission due to citing law and order) असल्याने दोन्ही गटाला परवानगी नाकारली (municipality denied permission to Dasara Melava) आहे. तसे पत्र पालिकेने दोन्ही गटांना दिले आहे.

पालिका परवानगी नाकारण्याचे कारण

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न -मुंबई पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दिलेल्या सूचनेनुसार, महापालिकेच्या जी उत्तर विभागाने ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटाला दसरा मेळावा साजरा करण्याची परवानगी नाकारली आहे. परवानगी नाकारल्याचे महापालिकेच्या जी उत्तर विभागाने दोन्ही गटाला आज पत्राद्वारे कळवले आहे. ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटात गणपती विसर्जनावेळी आणि त्यानंतर प्रभादेवीत राडा झाला होता. दसरा मेळव्याला परवानगी दिल्यास कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा अभिप्राय मुंबई पोलिसांनी महापालिकेला दिला आहे. कुणालाही परवानगी देऊ नका, असे मुंबई पोलीसांनी महापालिकेला सांगितले असल्याने दोन्ही गटाला परवानगी नाकारली असल्याचे पालिकेने दोन्ही गटाला कळविले (municipality denied permission for both groups) आहे. दरम्यान, आज उच्च न्यायालय काय निर्णय देते त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


काय आहे नेमका वाद -दादर शिवाजी पार्क येथे गेले ५६ वर्षे शिवसेनेचा दसरा मेळावा होत आला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता असे. बाळासाहेबांच्या निधनानंतरही शिवसेनेचा दसरा मेळावा ठरल्याप्रमाणे होत आहे. २०१२ नंतर उद्धव ठाकरे यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. त्यामुळे यापूर्वी मेळाव्यासाठी परवानगीसाठीचा अडथळा कधीही समोर आलेला नाही किंवा त्याची चर्चाही झालेली नाही. यावेळी मात्र राजकीय समिकरण बदलले आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदेनी बंड केल्यानंतर राजकीय चित्र बदलून गेले आहे. फुटलेला शिंदे गट आपण शिवसेनाच असल्याचा दावा करीत आहे. उद्धव ठाकरे गटाकडून परवानगीसाठी अर्ज केल्यावर शिंदे गटात सामिल झालेले स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी शिवाजी पार्क येथेच दसरा मेळाव्याची परवानगी मिळण्याबाबत महापालिकेच्या जी नॉर्थ विभागाकडे केला (permission to Dasara Melava) आहे.

२२ ऑगस्टला शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी उद्धव ठाकरे गटाकडून तर ३० ऑगस्ट रोजी सदा सरवणकर यांनी शिंदे गटाकडून अर्ज केला आहे. या अर्जावर पालिकेने निर्णय घेतलेला नसल्याने शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Last Updated :Sep 22, 2022, 2:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details