महाराष्ट्र

maharashtra

Aaditya Thackeray : 'महाराष्ट्राचे दरवाजे नेहमीच काश्मिरी पंडितांसाठी खुले'; आदित्य ठाकरेंच वक्तव्य

By

Published : Jun 4, 2022, 10:51 PM IST

देशात काश्मिरी पंडितांचा मुद्दा गंभीर आहे. केंद्र सरकार दोषींवर कारवाई करणार का, असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरेंनी मोदी सरकारवर निशाणा साधला ( Aaditya Thackeray talked over kashmiri pandits ) आहे.

Aaditya Thackeray
Aaditya Thackeray

मुंबई - राज्यसभेची निवडून अटीतटीची झाली आहे. त्यातच आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाविकास आघाडी विशेषतः शिवसेना दुसरी जागा जिंकणार आहे. देशात काश्मिरी पंडितांचा मुद्दा गंभीर आहे. केंद्र सरकार दोषींवर कारवाई करणार का, असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरेंनी मोदी सरकारवर निशाणा साधला ( Aaditya Thackeray talked over kashmiri pandits ) आहे. अंधेरी येथील स्पोर्ट कॉम्पेक्स येथील पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले की, देशात सध्या काश्मिरी पंडितांचा मुद्दा गंभीर आहे. केंद्र सरकार काय करणार, त्यांनी स्पष्ट करावे. निवडणुका येतात आणि जातात. सध्या काश्मीर मधील वातावरण चिंताजनक आहे. सर्वाधिक खेदजनक बाब म्हणजे इतक्या वर्षांनंतरही तेथील चित्र बदलले नाही. याउलट वातावरण आणखी खराब झाले आहे. महाराष्ट्राचे दरवाजे नेहमीच काश्मिरी पंडितांसाठी खुले आहेत. काश्मिरी पंडितांवर 'काश्मीर फाईल' चित्रपटाच्या पब्लिसीटबाबात किंवा कमाईवर बोलणार नाही. आता जाब विचारण्याऐवजी काय ठोस पावले उचलता येतील, यावर ठोस कारवाई करा, असे आवाहन केंद्र सरकारला केलं आहे.

पावसाळ्यात काळजी घ्या -मान्सून तोंडावर आला आहे. या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी वृक्षारोपण होत आहे. ही चांगली बाब आहे. १२ महिने ही मोहिम सुरु ठेवण्याची गरज आहे. उद्या शासनाचा माझी वसुंधरा हा पुरस्कार सोहळा होणार आहे. एकूण ८२ पुरस्कारांचे वितरण यावेळी केली जाणार आहेत. मात्र, रस्त्याशेजारी स्ट्रीट झाडे आहेत. त्याशिवाय पिंपळ आणि वडाच्या या मोठ्या झाडांचा समावेश आहे. यामध्ये जुनी झाडे कोसळून दुर्घटना होऊ नये, म्हणून खबरदारी घेत आहोत. झाडांच्या फांद्या छाटणे आणि इतर काळजी घेतली जात आहे. नागरिकांनीही काळजी घ्यावी, असे मंत्री आदित्य ठाकरेंनी सांगितले. तसेच, आरेच्या जंगलात कारशेडच्या मागणीकडे लक्ष देण्याची गरज नाही, असेही ठाकरेंनी म्हटलं आहे.

संघर्ष संपला, केवळ दर्शन घेणार - शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्याचे नियोजन म्हणजे फक्त भगवान रामाचे दर्शन घेणार आहोत. तेथील संघर्ष आता संपला आहे. किल्ले शिवनेरी वरून तिथे माती घेऊन गेलो होतो. त्यानंतर योगायोगाने कोर्टाच्या केसला चालना मिळाली. निकालामुळे मंदिर निर्माण होत असून, आता आशीर्वाद घ्यायला जात असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

हेही वाचा -Kishor Jorgewar : 'अपक्ष आमदारांच्या अस्मितेचे भान...'; 'घोडेबाजार' शब्दप्रयोगावरून आमदार जोरगेवारांची तीव्र नाराजी

ABOUT THE AUTHOR

...view details