ETV Bharat / state

Kishor Jorgewar : 'अपक्ष आमदारांच्या अस्मितेचे भान...'; 'घोडेबाजार' शब्दप्रयोगावरून आमदार जोरगेवारांची तीव्र नाराजी

author img

By

Published : Jun 4, 2022, 10:23 PM IST

निवडणूका आल्या की अपक्ष आमदार हे घोडेबाजार करतात, असा त्यांचा समज होतो. हा प्रयोग अत्यंत आक्षेपार्ह असून, तो थांबायला हवा, अशी प्रतिक्रिया जोगरेवार यांनी दिली ( kishor jorgewar angry on horse trading word ) आहे.

Kishor Jorgewar
Kishor Jorgewar

चंद्रपूर - राज्यसभा निवडणूकीचे मतदान काही दिवसांवर येवून ठेपले आहे. त्यामुळे विधानसभेतील अपक्ष आमदारांचे वजन चांगलेच वाडले आहे. भाजपा आणि शिवसेनेकडून अपक्ष आमदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपा आपला तिसरा उमेदवार निवडूण आणण्यासाठी घोडेबाजार करेल, असा आरोप शिवसेनेने केला आहे. त्यातच आता चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोगरेवार यांनी घोडेबाजार या शब्दावर आक्षेप घेत, राजकीय पक्षांचे कान टोचले आहेत. मोठ्या राजकीय पक्षांकडून अपक्ष आमदार म्हणजे घोडेबाजार करण्याचे साधन वाटते. निवडणूका आल्या की अपक्ष आमदार हे घोडेबाजार करतात, असा त्यांचा समज होतो. हा प्रयोग अत्यंत आक्षेपार्ह असून, तो थांबायला हवा, अशी प्रतिक्रिया जोगरेवार यांनी दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत ( kishor jorgewar angry on horse trading word ) होते.

किशोर जोगरेवार म्हणाले की, कोणत्याही मोठ्या नेत्याचं पाठबळ आणि राजकीय पक्षाच्या आधाराविना अपक्ष आमदार निवडून येतो. मोठे राजकीय पक्ष आणि नेत्यांना धूळ चारून निवडून येणे ही काही साधी बाब नाही. त्यामागे एका अपक्ष आमदाराचा कमालीचा संघर्ष असतो. मात्र, असे असताना मोठ्या राजकीय पक्षांकडून अपक्ष आमदार म्हणजे घोडेबाजार करण्याचे साधन वाटते. निवडणूका आल्या की अपक्ष आमदार हे घोडाबाजार करतात, असा त्यांचा समज होतो. हा प्रयोग अत्यंत आक्षेपार्ह असून तो थांबायला हवा. अपक्ष आमदारांच्या अस्मितेचा प्रश्न आहे, असे म्हणत त्यांनी 'घोडेबाजार' या शब्दावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

आमदार किशोर जोरगेवार प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

फक्त शिवसेनेकडून नव्हे तर सर्वच राजकीय पक्षांकडून घोडेबाजार या शब्दाचा प्रयोग केला जातोय. पण, हा शब्दप्रयोग आक्षेपार्ह आहे. यामुळे अपक्ष आमदारांच्या भावना दुखावल्या जात आहेत. हा शब्दप्रयोग थांबविण्याची गरज आहे. यासाठी आपण मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष यांना पत्र देणार आहे, असेही किशोर जोरगेवार यांनी 'ईटिव्ही भारत'शी बोलताना म्हटले आहे.

हेही वाचा - Sanjay Raut Sharad Pawar Interview : महाविकास आघाडी सरकार हे बाळासाहेबांच्या स्वप्नातील सरकार; संजय राऊतांचे विधान, तर पवारांचाही दुजोरा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.