महाराष्ट्र

maharashtra

Ganesh festival celebration धुमधडाक्यात साजरा होतोय गणेशोत्सव, पहा भाविकांचा उत्साह

By

Published : Sep 4, 2022, 8:21 PM IST

Ganesh Chaturthi 2022 दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव Ganeshotsav 2022 साजरा करताना भक्तांचा उत्साह शिगेला, चांद्यापासून बांद्यापर्यंत गणपती बाप्पाच्या आगमनाची लगबग होती.

Ganesh Chaturthi 2022
Ganesh Chaturthi 2022

मुंबईलालबागच्या राजाची स्थापना स्थानिक कोळी बांधव आणि व्यापाऱ्यांनी केली होती. दरवर्षी गणेशोत्सवातील पाचव्या दिवशी स्थानिक कोळी महिला लालबागच्या राजाची वाजत गाजत पारंपरिक मानाची पूजा करतात. पूजा झाल्यावर लालबाग मार्केटमध्येच Ganesh festival celebration in Maharashtra कोळी महिला पारंपरिक वेशभूषेत आणि वाद्यांच्या तालावर फेर धरून नृत्य आज साकरले आहेत.

Ganesh Chaturthi 2022

मुंबईआज पाच दिवसाच्या बाप्पाच्या विसर्जन जड अंतकरणाने भक्तगण करत आहे. मुंबई महानगर पालिकेने मुंबई तसेच मुंबई उपनगराच्या परिसरात जवळपास 200 च्यावर कृत्रिम विसर्जन स्थळ तयार केली आहेत. या कृत्रिम विसर्जन स्थळांना विसर्जनासाठी भक्तांकडून देखील पसंती देण्यात येत आहे. दादर चौपाटी परिसरात जी उत्तर विभागाकडून कृत्रिम विसर्जन स्थळाच्या निर्मिती करण्यात आली आहे. आपल्या बापाला भावपूर्ण निरोप भक्तांकडून देण्यात येत आहे. Ganesh festival celebration in Maharashtra मात्र गेली दोन वर्ष कोरोनाच्या सावटात मध्ये गेली. मात्र यावर्षी निर्बंध मुक्त असा सण साजरा करतोय अशीच बाप्पाची कृपा सर्वांवर राहू दे. येणाऱ्या काळातही सर्वांवर ची विघ्न दूर होऊ दे अशी मागणी भक्तगण निरोप देताना बाप्पाकडे करत आहे.

Ganesh Chaturthi 2022

पुणेयंदा निर्वांधमुक्त गणेशोत्सव साजरा होत असून गणेशोत्सवाला सुरवात होऊन आज 5 दिवस पूर्ण झाली आहे. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. पुणे शहरातील गणेशोत्सव हा जगप्रसिद्ध असून Ganesh festival celebration in Maharashtra विविध ठिकाणाहून लोक हे बाप्पाच्या दर्शनासाठी पुण्यातील विविध गणेश मंडळ तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाला भेट देत असतात. आज मोठ्या संख्येने भाविकांनी बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे.

Ganesh Chaturthi 2022

पुणेभारत माता की जय...वंदे मातरम चा घोषणेने दुमदुमून गेलेला परिसर... सैनिक आणि पोलिसांवरती केलेली फुलांची उधळण... अभिमानाने प्रत्येकाने हाती धरलेला भारताचा तिरंगा... अशा देशभक्तीने भारलेल्या वातावरणात हिंदू आणि मुस्लिम गणेश भक्तांनी दिव्यांग सैनिक आणि Ganesh festival celebration in Maharashtra पोलिसांसोबत देशभक्ती व हिंदू मुस्लिम एकतेचा नारा दिला. शहराच्या पूर्व भागातील चौका-चौकात महिलांनी केलेले औक्षण, फुलांची झालेली उधळण आणि भारत मातेचा जयघोष ऐकून सैनिकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

Ganesh Chaturthi 2022

पुणेदोन वर्षाच्या निर्बंधानंतर पुणे शहरात मोठ्या उत्साहात गणेशउत्सव साजरा होत असून मोठ्या संख्येने देश विदेशातील भाविक हे बाप्पाच्या दर्शनासाठी येत आहे. तसेच राज्यातील राजकीय मंडळी, सेलिब्रिटी हे देखील विविध मंडळांना भेट आहे. आज विधान परिषद उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या समवेत Ganesh festival celebration in Maharashtra शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे Shiv Sena chief Uddhav Thackeray यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर आणि त्यांच्या पत्नी मीरा नार्वेकर तसेच डॉ. गोऱ्हे यांच्या भगिनी जेहलम जोशी यांनी मानाच्या गणेश मंडळांसह विविध गणेश मंडळांना भेट दिली आहे.

Ganesh Chaturthi 2022

मलाडआत्तापर्यंत तुम्ही गणपती बाप्पा लोकांच्या घरात आणि मोठ्या पंडालमध्ये पाहिला असणार आहे. पण बोरिवलीमध्ये असा गणपती बाप्पा आहे, जो हॉस्पिटलमध्ये बसला आहे. बाप्पाची आरती रुग्णालयातील डॉक्टर करतात, त्यानंतर रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक दुसऱ्यांदा रुग्णालयात आरती करतात. बोरिवलीच्या फिनिक्स हॉस्पिटलमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. या हॉस्पिटलच्या गणपती बाप्पाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे डॉक्टरांसह रुग्णालयात दाखल रुग्णही बाप्पाची आरती आणि पूजा करतात.

हेही वाचाEnvironment complementary idol पर्यावरण पूरक मूर्ती, सजावटीसाठी टिशू पेपर आणि कागदी पुठ्याचा वापर

ABOUT THE AUTHOR

...view details