ETV Bharat / city

Environment complementary idol पर्यावरण पूरक मूर्ती, सजावटीसाठी टिशू पेपर आणि कागदी पुठ्याचा वापर

author img

By

Published : Sep 4, 2022, 6:02 PM IST

Environment complementary idol
Environment complementary idol

Environment complementary idol मीरा भाईंदर शहरातील सर्वात उंच मूर्ती पर्यावरण पूरक मूर्ती आणण्यात आले आहे. ही मूर्ती टिशू पेपर, कागदी पुठ्या, कागदा पासून तयार केली आहे. मूर्ती पाहण्यासाठी गणेश भक्तांची चांगली गर्दी होऊ लागली आहे. भाईंदर पूर्वेच्या नवघर रोडचा राजा म्हणून ओळखला जाणारा गणपती बाप्पा या वर्षी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. Environment complementary idol नवयुवक मित्रा मंडळाचा यंदा २१ वे वर्षात पदार्पण करत आहे.

मीरा भाईंदर मीरा भाईंदर शहरातील सर्वात उंच मूर्ती पर्यावरण पूरक मूर्ती आणण्यात आले आहे. ही मूर्ती टिशू पेपर, कागदी पुठ्या, कागदा पासून तयार केली आहे. मूर्ती पाहण्यासाठी गणेश भक्तांची चांगली गर्दी होऊ लागली आहे. भाईंदर पूर्वेच्या नवघर रोडचा राजा म्हणून ओळखला जाणारा गणपती बाप्पा या वर्षी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. Environment complementary idol नवयुवक मित्रा मंडळाचा यंदा २१ वे वर्षात पदार्पण करत आहे. त्यामुळे मंडळांनी या वर्षी इको फ़्रेंडली गणपती बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

पर्यावरण पूरक मूर्ती

3 महिन्यांच्या अथक परिश्रम मुंबईतील प्रसिद्ध मूर्तिकार राजेश सोनवणे Famous Sculptor Rajesh Sonwane from Mumbai यांनी टिशू पेपर, पुठ्ठे, कागदापासून मूर्ती तयार करण्याचा निर्णय घेतला.Environment complementary idol त्यानुसार 3 महिन्यांच्या अथक परिश्रम नंतर सुंदर आणि सुबक मूर्ती त्यांनी घडवली आहे. tissue paper and paper bags used ही मूर्ती मीरा भाईंदरसह मुंबई उपनगरात आकर्षणाचा केंद्र ठरला आहे.

पर्यावरण पूरक मूर्ती राज्य सरकारने वारंवार सूचना दिल्यानंतर देखील अनेक मंडळात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या माध्यमातून मूर्ती स्थापन केल्या आहे. सध्याची प्रदूषणाची परिस्थिती पाहता जल प्रदूषणात वाढ झाली आहे. त्यामुळे पर्यावरणाला धोका संभवतो, म्हणून शाडूच्या किंवा पर्यावरण पूरक मूर्ती जास्त प्रमाणात गणेश भक्तांनी स्थापन करणे गरजेचे आहे. Environment complementary idol गणेशोत्सवाच्या काळात जलप्रदूषण मोठया प्रमाणावर होते. हे प्रदूषण थांबविणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे यासाठी नवयुवक मित्र मंडळाने पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही संकल्पना राबविली आहे. भाईंदर पूर्वेच्या नवयुवक मित्र मंडळाकडून कागदी मूर्ती बसवून समजला एक चांगला संदेश दिला आहे. या मंडळाचे सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

ही काळाची गरज आजकाल साजरे होणारे गणेशोत्सव हे पर्यावरणाला हानीकारक तर ठरत नाहीत ना, याकडे मात्र आज लक्ष देण्याची वेळ आली आहे. कोणताही उत्सव साजरा करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेणे आवश्यक आहे. गणेशोत्सवामधील पावित्र्य आणि पर्यावरण संरक्षण यासाठी गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा होणे, ही काळाची गरज आहे. यासाठी आपण सर्वांनी आग्रही राहिले पाहिजे. प्रत्येकाने आपला दृष्टिकोन पर्यावरणस्नेही ठेवला तरच उत्सव साजरे करण्याबाबत सामाजिक परिवर्तन होऊ शकेल, अशी प्रतिक्रिया मंडळाचे सचिव सचिन पोतनीस यांनी दिले आहे.

हेही वाचा Chintamani Mandal workers beat devotees मुंबईत चिंतामणी गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून भाविकांना मारहाण, घटनेचा व्हिडीओ समोर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.