महाराष्ट्र

maharashtra

India corona update today : भारतावरील संकट जाता जाईना! देशात 24 तासांत कोरोनाचे 16,103 नवे रुग्ण

By

Published : Jul 3, 2022, 10:14 AM IST

आरोग्य विभागाने गुरुवारी दिलेल्या आकडेवारीनुसार २४ तासांत नवीन कोरोना रुग्णांचे प्रमाण तुलनेत 45.4 टक्के अधिक आहे. देशात एकूण 4,34,07,046 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 24 तासात एकूण 4,53,940 लोकांचे कोरोना तपासणीसाठी नमुने घेण्यात आले आहेत. केवळ महाराष्ट्रात 38.03 टक्के नवीन रुग्ण- पाच राज्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.

India corona update today
कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण

मुंबई - भारतात गेल्या 24 तासांत 16,103 नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर 31 जणांचा मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1,11,711 झाली. तर पॉझिटिव्हिटीचा दर ( corona positivity rate ) 4.27 टक्के आहे. ( India corona update today )

सध्या राज्याच्या मृत्यूदर 1.85 टक्क्यांवर गेला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.82 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यात 25,735 सक्रिय कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली असून, मुंबईमध्ये सर्वाधिक 11,844 इतक्या सक्रिय कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, या पाठोपाठ ठाण्यात 5655 सक्रिय रुग्ण आहेत. दुसरीकडे देशात 14 हजार 506 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून 30 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 99 हजार 602 वर गेली आहे.

कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात - आरोग्य विभागाने गुरुवारी दिलेल्या आकडेवारीनुसार २४ तासांत नवीन कोरोना रुग्णांचे प्रमाण तुलनेत 45.4 टक्के अधिक आहे. देशात एकूण 4,34,07,046 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 24 तासात एकूण 4,53,940 लोकांचे कोरोना तपासणीसाठी नमुने घेण्यात आले आहेत. केवळ महाराष्ट्रात 38.03 टक्के नवीन रुग्ण- पाच राज्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यात महाराष्ट्र अव्वल स्थानावर ( Covid cases in Maharashtra today ) आहे. येथे 6,493 कोरोना रुग्ण आढळले आहेत. यानंतर केरळमध्ये 3,378, दिल्लीत 1,891, तामिळनाडूमध्ये 1,472 आणि उत्तर प्रदेशमध्ये 572 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. नवीन प्रकरणांपैकी 80.87% या पाच राज्यांमध्ये नोंदवले गेले आहेत. एकट्या महाराष्ट्रात ३८.०३% नवीन रुग्ण आढळले आहेत. देशातील कोरोनातून बरे होण्याचा दर आता 98.57 टक्के आहे. एकूण मृतांची संख्या 5,25,020 झाली आहे. ( India corona update today )

मुंबईत कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबईत गेल्या २४ तासात १४ हजार १२९ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १५०४ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. चाचण्यांच्या प्रमाणात १०.६४ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. आज ३ मृत्यूची नोंद झाली आहे. १६४५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे ( India corona update today ). आतापर्यंत एकूण ११ लाख ११ हजार २२७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ७९ हजार ७७४ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा -India corona update today : भारतात गेल्या 24 तासात 17,092 नवीन कोरोना रुग्ण, 29 जणांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details