ETV Bharat / city

India corona update today : भारतात गेल्या 24 तासात 17,092 नवीन कोरोना रुग्ण, 29 जणांचा मृत्यू

author img

By

Published : Jul 2, 2022, 10:26 AM IST

भारतात गेल्या 24 तासांत 17,092 नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर 29 जणांचा मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1,09,568 झाली. तर पॉझिटिव्हिटीचा दर ( corona positivity rate ) 4.14 टक्के आहे.

India corona update today
नवीन कोरोना रुग्ण

मुंबई- भारतात गेल्या 24 तासांत 17,092 नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर 29 जणांचा मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1,09,568 झाली. तर पॉझिटिव्हिटीचा दर ( corona positivity rate ) 4.14 टक्के आहे. ( India corona update today )

मुंबईत कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबईत गेल्या २४ तासात १४ हजार १२९ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १५०४ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. चाचण्यांच्या प्रमाणात १०.६४ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. आज ३ मृत्यूची नोंद झाली आहे. १६४५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे ( India corona update today ). आतापर्यंत एकूण ११ लाख ११ हजार २२७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ७९ हजार ७७४ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात -आरोग्य विभागाने गुरुवारी दिलेल्या आकडेवारीनुसार २४ तासांत नवीन कोरोना रुग्णांचे प्रमाण तुलनेत 45.4 टक्के अधिक आहे. देशात एकूण 4,34,07,046 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 24 तासात एकूण 4,53,940 लोकांचे कोरोना तपासणीसाठी नमुने घेण्यात आले आहेत. केवळ महाराष्ट्रात 38.03 टक्के नवीन रुग्ण- पाच राज्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यात महाराष्ट्र अव्वल स्थानावर ( Covid cases in Maharashtra today ) आहे. येथे 6,493 कोरोना रुग्ण आढळले आहेत. यानंतर केरळमध्ये 3,378, दिल्लीत 1,891, तामिळनाडूमध्ये 1,472 आणि उत्तर प्रदेशमध्ये 572 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. नवीन प्रकरणांपैकी 80.87% या पाच राज्यांमध्ये नोंदवले गेले आहेत. एकट्या महाराष्ट्रात ३८.०३% नवीन रुग्ण आढळले आहेत. देशातील कोरोनातून बरे होण्याचा दर आता 98.57 टक्के आहे. एकूण मृतांची संख्या 5,25,020 झाली आहे. ( India corona update today )

रुग्णसंख्या घटली: मुंबईत दोन वर्षात कोरोनाच्या दोन लाटा आल्या. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. तीसऱ्या लाटेत ६ ते ८ जानेवारी दरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. मे महिन्याच्या अखेरीस ३१ मे ला ५०६, १ जून ला ७३९, २ जून ला ७०४, ३ जूनला ७६३, ४ जून ला ८८९, ५ जून ला ९६१, ७ जून ला १२४२, ८ जूनला १७६५, १२ जूनला १८०३, १३ जूनला १११८, १४ जूनला १७२४, १५ जूनला २२९३, १६ जूनला २३६६, १७ जूनला २२५५, १८ जूनला २०५४, १९ जूनला २०८७, २० जूनला १३१०, २१ जूनला १७८१, २२ जूनला १७४८, २३ जूनला २४७९, २४ जूनला १८९८, २५ जूनला ८४०, २६ जुनला १७००, २७ जुनला १०६२, २८ जुनला १२९०, २९ जुनला १५०४, ३० जुनला १२६५, १ जुलैला ९७८ रुग्णांची नोंद झाली आहे.

हेही वाचा - Mumbai Corona Update: रुग्णसंख्या हजारच्या खाली, ९७९ रुग्णांची नोंद, २ मृत्यू, २४ व्हेंटिलेटरवर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.