महाराष्ट्र

maharashtra

COVID19: भारतात गेल्या 24 तासात 14,506 नवीन कोरोना रुग्ण, 30 जणांचा मृत्यू

By

Published : Jun 29, 2022, 10:04 AM IST

Corona Update

देशातील कोरोना ( Corona ) रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. गेल्या 24 तासात 14,506 नवीन रुग्ण आढळले आहेत. एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 99,602 हजारांच्या पुढे गेली आहे. मार्चनंतर पहिल्यांदाच उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

मुंबई-देशातील कोरोना ( Corona ) रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. गेल्या 24 तासात 14,506 नवीन रुग्ण आढळले आहेत. एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 99,602 हजारांच्या पुढे गेली आहे. मार्चनंतर पहिल्यांदाच उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ३,६५९ रुग्ण आढळले आहेत. येथे 3,356 रुग्ण बरे झाले आणि 1 रुग्णाचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या २४,९१५ आहे. मंगळवारी 39,094 कोविड ( COVID19 ) चाचण्या घेण्यात आल्या आणि सकारात्मकता दर 9.36% नोंदवला गेला. एका दिवसापूर्वी, राज्यात 2,354 नवीन रुग्ण आढळून आले होते आणि सकारात्मकता दर 10.36% नोंदवला गेला.

आरोग्य विभागाने दिलेल्या सोमवारीच्या आकडेवारीनुसार २४ तासांत नवीन कोरोना रुग्णांचे प्रमाण रविवारच्या तुलनेत 45.4 टक्के अधिक आहे. देशात एकूण 4,34,07,046 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 24 तासात एकूण 4,53,940 लोकांचे कोरोना तपासणीसाठी नमुने घेण्यात आले आहेत.केवळ महाराष्ट्रात 38.03 टक्के नवीन रुग्ण- पाच राज्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यात महाराष्ट्र अव्वल स्थानावर ( Covid cases in Maharashtra today ) आहे. येथे 6,493 कोरोना रुग्ण आढळले आहेत. यानंतर केरळमध्ये 3,378, दिल्लीत 1,891, तामिळनाडूमध्ये 1,472 आणि उत्तर प्रदेशमध्ये 572 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. नवीन प्रकरणांपैकी 80.87% या पाच राज्यांमध्ये नोंदवले गेले आहेत. एकट्या महाराष्ट्रात ३८.०३% नवीन रुग्ण आढळले आहेत. देशातील कोरोनातून बरे होण्याचा दर आता 98.57 टक्के आहे. एकूण मृतांची संख्या 5,25,020 झाली आहे.

११.९९ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह :मुंबईत कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबईत गेल्या २४ तासात ८ हजार ८४५ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १०६२ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. चाचण्यांच्या प्रमाणात ११.९९ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. आज ५ मृत्यूची नोंद झाली आहे. १३०५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ८ हजार ४३३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ७६ हजार ३५० रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १२ हजार ४७९ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ४३३ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.१५१ टक्के इतका आहे.

हेही वाचा-India Corona Update : देशात 11,79 कोरोनाचे रुग्ण, सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रात

ABOUT THE AUTHOR

...view details