India Corona Update : देशात 11,79 कोरोनाचे रुग्ण, सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रात

author img

By

Published : Jun 28, 2022, 9:02 AM IST

Updated : Jun 28, 2022, 9:23 AM IST

कोरोना अपडेट

पाच राज्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यात महाराष्ट्र अव्वल स्थानावर ( Covid cases in Maharashtra today ) आहे. येथे 6,493 कोरोना रुग्ण आढळले आहेत. यानंतर केरळमध्ये 3,378, दिल्लीत 1,891, तामिळनाडूमध्ये 1,472 आणि उत्तर प्रदेशमध्ये 572 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

मुंबई - देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ ( Omicron Cases in India today ) झाली आहे. सोमवारीच्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत 17 हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण ( India Coronavirus tracker ) आढळले आहेत. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. गेल्या काही दिवसांपासून येथे सातत्याने सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. विशेषत: मुंबईत संसर्गाचा वेग वाढताना दिसत आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या सोमवारीच्या आकडेवारीनुसार २४ तासांत नवीन कोरोना रुग्णांचे प्रमाण रविवारच्या तुलनेत 45.4 टक्के अधिक आहे. देशात एकूण 4,34,07,046 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 24 तासात एकूण 4,53,940 लोकांचे कोरोना तपासणीसाठी नमुने घेण्यात आले आहेत.

केवळ महाराष्ट्रात 38.03 टक्के नवीन रुग्ण- पाच राज्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यात महाराष्ट्र अव्वल स्थानावर ( Covid cases in Maharashtra today ) आहे. येथे 6,493 कोरोना रुग्ण आढळले आहेत. यानंतर केरळमध्ये 3,378, दिल्लीत 1,891, तामिळनाडूमध्ये 1,472 आणि उत्तर प्रदेशमध्ये 572 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. नवीन प्रकरणांपैकी 80.87% या पाच राज्यांमध्ये नोंदवले गेले आहेत. एकट्या महाराष्ट्रात ३८.०३% नवीन रुग्ण आढळले आहेत. देशातील कोरोनातून बरे होण्याचा दर आता 98.57 टक्के आहे. एकूण मृतांची संख्या 5,25,020 झाली आहे.

मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. गेले काही दिवस २ हजारावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर कोरोना रुग्णांच्या ( Mumbai Corona Update ) संख्येत किंचित घट होऊ लागली आहे. पालिकेकडून चाचण्या कमी केल्या जात असल्याने आज ( सोमवारी ) १०६२ रुग्णांची नोंद झाली ( 1062 New Corona patients Mumbai ) आहे. सोमवारी ५ जणांचा मृत्यू ( Corona news Maharashtra today ) झाला आहे. मुंबईत सध्या ६६८ बेडवर रुग्ण आहेत. त्यापैकी ८४ रुग्ण ऑक्सिजनवर, १६५ रुग्ण आयसीयूमध्ये तर २१ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

११.९९ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह : मुंबईत कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबईत गेल्या २४ तासात ८ हजार ८४५ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १०६२ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. चाचण्यांच्या प्रमाणात ११.९९ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. आज ५ मृत्यूची नोंद झाली आहे. १३०५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ८ हजार ४३३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ७६ हजार ३५० रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १२ हजार ४७९ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ४३३ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.१५१ टक्के इतका आहे.

हेही वाचा-Mumbai Corona Update : चाचण्या कमी झाल्याने सोमवारी १०६२ रुग्णांची नोंद, ५ जणांचा मृत्यू

हेही वाचा-coronaviruses increasing : ५० टक्के ठाणेकरांना कोरोनाच्या चौथ्या लाटेचा फटका ?

हेही वाचा-Maharashtra Corona : राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढते आहे; 'ही' आहेत प्रमुख कारणे, वाचा सविस्तर...

Last Updated :Jun 28, 2022, 9:23 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.