ETV Bharat / city

coronaviruses increasing : ५० टक्के ठाणेकरांना कोरोनाच्या चौथ्या लाटेचा फटका ?

author img

By

Published : Jun 16, 2022, 2:30 PM IST

Updated : Jun 16, 2022, 3:22 PM IST

Municipal Commissioner Dr. Vipin Sharma
पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा

राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची ( coronaviruses increasing ) नोंद होत असताना चौथ्या लाटेचा सौम्य फटका ठाण्यातील ५० टक्के ( corona in Thane citizens ) नागरिकांना बसला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागरिकांनी पहिला दुसरा डोस घेऊन ही काही जणांना सौम्य लक्षणे ( Mild symptoms of corona ) दिसून आली असून घरीच उपचार घेऊन दोन दिवसांत ठणठणीत बरे झाले आहेत असा दावा करण्यात आला आहे.

ठाणे - राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची ( coronaviruses is increasing ) नोंद होत असताना चौथ्या लाटेचा सौम्य फटका ठाण्यातील ५० टक्के ( corona in Thane citizens ) नागरिकांना बसला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागरिकांनी दुसरा डोस घेऊनही काही जणांना सौम्य लक्षणे ( Mild symptoms of corona ) दिसून आली. नागरिकांनी घरीच उपचार घेऊन दोन दिवसांत बरे झाल्याचा दावा केला आहे. या वृत्ताला पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी देखील दुजोरा दिला आहे. गेल्या ३ आठवड्यापासून अनेकांना सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसून आली होती. मात्र, कोविड चाचणी न करता अनेकांनी घरीच राहून उपचार घेतले आहेत.

विपिन शर्मा यांची प्रतिक्रिया

सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला - भारतात कोरोनाच्या पहिल्या तीन लाटांचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. यामध्ये राज्यात रुग्णसंख्येचे उच्चांक नोंदवले गेले आहेत. त्यातच प्रत्येक लाटेत नव्या व्हेरियटने डोके ( Corona infection ) वर काढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यात कोरोना नियंत्रणात असली तरी, वाढत्या कोरोना रुग्णांमुळे कोणताही धोका नसल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यासह शहारत वाढत्या रुग्णाची संख्या लक्षात घेता लसीकरणावर भर दिला जात आहे. 'मिशन हर घर दस्तक' मोहिमेअंतर्गत लसीकरण केले जात असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली.

लसीकरणावर भर - वाढत्या रुग्णसंख्येसोबतच जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभाग सतर्क ( District Health Department alert ) झाला आहे. लागण झालेल्या कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या चौथ्या लाटेचा फटका अनेकांना बसला असला तरी, कोणाला त्रास झालेला नाही. ठाणे शहारत दररोज हजाराहून अधिक कोविड चाचण्या ( Covid tests ) करण्यात येत आहे. यामध्ये अनेक जणांना कोरोनाची लागन झाल्याचे आढळून आले आहे.


घरोघरी जाऊन लसीकरण - ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहारत घरोघरी जाऊन लसीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. ज्या नागरीकांनी दुसरा डोस घेतला नाही त्यांचे लसीकरण केले जात असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी दिली. कोविड बाबत सावधानी बाळगणे आवश्यक असून नागरिकांनी काळजी घ्यावी असे पालिकेकडून करण्यात आले आहे.

पालिकेची यंत्रणा सज्ज - वाढत्या रुग्णसंखेमुळे पालिका प्रशासनाची यंत्रणा सज्ज झाली आहे. महापालिकेचे जम्बो कोविड सेंटर असलेले पार्किंग प्लाझा रुग्णालयात १ हजार १०० बेड उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हॉटस रुग्णालय देखील सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सद्या बेड उपलब्ध असून ऑक्सिजनचा साठा पुरेसा असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

नव्या व्हेरीयंटचे २ रुग्ण - ठाण्यातील कोरोना रुग्णांची संख्या वारंवार वाढत आहे. त्यात कोरोनाचा नवीन व्हेरीयंटची भर पडली आहे. आतापर्यंत २ रुग्ण नवीन व्हेरीयंट बिए ५ चे आढळून आले आहेत. या रुग्णांमध्ये कोरडा खोकला, ताप अशी सौम्य लक्षणे आढळले आहे. हा व्हेरीयंट चिंताजनक नसल्याचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संगीता माकोडे यांनी सांगितले. तर, चौथ्या लाटेचा सामना करण्यासाठी नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे असे, अवाहन डॉ. मेकोडे यांनी केले आहे.



जिल्हात कोरोना रुग्णसंख्येत झाली वाढ - ठाणे जिल्ह्यात आज एकूण कोरोना रुग्णाची संख्या 8,52 झाली आहे. आता पर्यंत कोरोना बाधित संख्या 7 लाख 16 हजार,157 वर पोहचली आहे.
सक्रिय रुग्ण- 3453
जिल्यात आता पर्यंत मृत्यू - 11 हजार 896
आता पर्यंत उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या- 6 लाख ,99 हजार,767

पालिका क्षेत्रात कोरोना रुग्णाची संख्या - 323
आता पर्यंत कोरोना बाधित संख्या-1, लाख 86 हजार, 575
सक्रिय रुग्ण- 1416
मृत्यू-0
पालिका हद्दीत आता पर्यंत मृत्यू- 2131
आता पर्यंत उपचार घेऊन बरे झालेले रुग्ण - 1,लाख 82 हजार, 705

हेही वाचा - राहुल गांधी ईडी चौकशी प्रकरण : काँग्रेस शिष्टमंडळाने घेतली ओम बिर्लांची भेट, देशभर काँग्रेसची निदर्शने

हेही वाचा - Record sugar production : राज्यात यंदा 100 वर्षांतील विक्रमी साखर उत्पादन, अतिरिक्त उसाचा प्रश्न संपल्याचा दावा

हेही वाचा - हवाईप्रवास महागणार.. भाड्यामध्ये १० ते १५ टक्के दरवाढ करण्याचे 'स्पाईसजेट'चे संकेत

Last Updated :Jun 16, 2022, 3:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.