महाराष्ट्र

maharashtra

Ajit Pawar Critics on Central Government : गुजरातमधून किती रेल्वे सुटल्या ते पहावे - अजित पवार

By

Published : Feb 10, 2022, 5:27 PM IST

Updated : Feb 10, 2022, 5:49 PM IST

कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी महाराष्ट्रात आणि मुंबईत काम करणारे अनेक मजूर आपल्या गावाकडे निघाले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला, मुले आणि गर्भवती महिलाही होत्या. त्यावेळी राज्य सरकारकडून त्या मजुरांना सुविधा देण्याचा प्रयत्नही केला गेला. तसेच केंद्र सरकारकडून मिळालेल अन्नही त्या मजुरांपर्यंत पोहोचविले जात होते. तेव्हाची परिस्थिती अशी होती की, मजूर थांबायला तयार नव्हते. मजूर चालत उत्तर भारताच्या दिशेने निघाले होते ही वस्तुस्थिती आहे. मात्र, महाराष्ट्राने मजूर उत्तर भारतात पाठवले म्हणून कोरोना पसरला, असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत म्हणाले होते. त्यामुळे काही लोके राजकीय भूमिकेतून बोलतात, असा टोला अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांना लगावला.

अजित पवार
अजित पवार

मुंबई - कोरोना काळात परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी गुजरात व महाराष्ट्रातून किती रेल्वे सुटल्या याबाबत खासदार सुप्रिया सुळे ( MP Supriya Sule ) यांनी माहिती दिली आहे. गुजरात व इतर राज्यांतून किती रेल्वे केंद्र सरकारकडून सोडण्यात आल्या ते पहावे, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रावर निशाणा साधला ( Ajit Pawar Critics on Central Government ). ते म्हणाले, रेल्वे सोडल्याबद्दल त्यांच्याच पक्षाचे नेते व कार्यकर्ते केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचे आभार का ( Railway Minister Piyush Goyal ) मानले, याचा विचार करायला हवा, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. औरंगाबादच्या गंगापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष संजय जाधव यांच्यासह सहा नगरसेवकांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी झालेल्या कार्यक्रमानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

पंतप्रधान मोदींना टोला -कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी महाराष्ट्रात आणि मुंबईत काम करणारे अनेक मजूर आपल्या गावाकडे निघाले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला, मुले आणि गर्भवती महिलाही होत्या. त्यावेळी राज्य सरकारकडून त्या मजुरांना सुविधा देण्याचा प्रयत्नही केला गेला. तसेच केंद्र सरकारकडून मिळालेल अन्नही त्या मजुरांपर्यंत पोहोचविले जात होते. तेव्हाची परिस्थिती अशी होती की, मजूर थांबायला तयार नव्हते. मजूर चालत उत्तर भारताच्या दिशेने निघाले होते ही वस्तुस्थिती आहे. मात्र, महाराष्ट्राने मजूर उत्तर भारतात पाठवले म्हणून कोरोना पसरला, असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत म्हणाले होते. त्यामुळे काही लोके राजकीय भूमिकेतून बोलतात, असा टोला अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांना लगावला.

कोरोनाकाळात महाराष्ट्र सरकाने केलेल्या कामाचे सर्व स्तरातून कौतूक - कोरोनामध्ये महाराष्ट्र सरकारकडून झालेल्या कामाबद्दल अनेक स्तरावर कौतुक झाले. न्यायालयानेही राज्य सरकारचे कौतुक केले, असे अजित पवार यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकारे महाराष्ट्रवर आरोप केले. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेमध्ये उत्तर दिले आहे. यावेळी कोणत्या राज्यातून किती रेल्वे सोडण्यात आल्या याबाबत सविस्तर माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली असल्याचाही त्यांनी पत्रकार परिषद सांगितले. तसेच शरद पवार हे संकटाच्यावेळी नेहमी पक्ष, जात, धर्म, प्रांत न पाहता मदतीला धावतात, यामुळे पंतप्रधानांनी शरद पवार यांचे कौतुक लोकसभेत केले असल्याचेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

जाती धर्मात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे -सध्या हिजाब मुद्द्यावरून देशात अनेक ठिकाणी तणाव निर्माण झाला आहे. मात्र, जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण होणार नाहीत याची काळजी राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. आपल्या देशात सर्वधर्मसमभाव आहे. राज्यघटनेत काय लिहिले आहे याचे आत्मचिंतन आपण सर्वांनी करण्याची गरज आहे. समाजातील वातावरण खराब होणार नाही, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. पण, दुर्दैवाने राजकीय पोळी भाजण्यासाठी असे मुद्दे बाहेर काढले जातात, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

केंद्र सरकार कडे 33 हजार कोटीचा जीएसटी बाकी -अद्यापही केंद्र सरकारकडे राज्य सरकारचा 33 हजार कोटीचा जीएसटी परतावा येणे बाकी आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारच्या महसूल उत्पन्नातही मोठी घट झाली होती. मात्र, जानेवारीमध्ये केंद्र सरकारला जीएसटीचा परतावा चांगला आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भावही कमी झाल्याने आता केंद्राकडून जास्तीत जास्त जीएसटी परतावा मिळेल, अशी आशा अजित पवारांनी व्यक्त केली.

चंद्रकांत पाटलांनी पुरावे द्यावेत -उपमुख्यमंत्री राज्यभरात हेलिकॉप्टर घेऊन जमिन बघण्यासाठी जात असतात, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Paitl ) यांनी केला होता. त्यावर अजित पवार म्हणाले, चंद्रकांत पाटील यांच्याकडे काही पुरावे असल्यास त्यांनी ते समोर आणावेत. चंद्रकांत पाटील हे एक जबाबदार व्यक्ती आहेत. त्यांनी असे बिनबुडाचे आरोप करू नयेत. "उचलली जीभ लावली टाळ्याला", असे चंद्रकांत पाटलांनी करू नये, असा टोला पवार यांनी यावेळी लगावला.

अण्णा हजारे यांना महसूल विभागाचे अधिकारी भेटणार -सुपर मार्केटमध्ये वाईन विकण्याच्या निर्णयाच्या विरोधात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मात्र, या निर्णयाबाबत माहिती देण्यासाठी अण्णा हजारे यांची भेट उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आज घेणार असल्याचेही यावेळी अजित पवार यावेळी सांगितले.

सोमैया मारहाण प्रकरणात पोलीस तपास करताहेत -किरीट सोमैया यांना मारण्याचा प्रयत्न झाला ( Kirit Somaiya ) असल्याचे पत्र चंद्रकांत पाटील यांनी गृहमंत्री अमित शाह ( Union Minister Amit Shah ) यांना दिले. मात्र, या प्रकरणात दिल्लीच्या तपास यंत्रणाने पोलिसांसोबत चर्चा केली आहे. देशाच्या कोणत्याही भागांमध्ये घटना घडल्यास त्या घटनेची जबाबदारी राज्याच्या पोलिसांची असते. याच घटनेची तक्रार कोणी केंद्रीय गृहमंत्र्यांना केली तर त्याची चौकशी करण्याचा अधिकारही केंद्रीय तपास यंत्रणेला असल्याचे यावेळी अजित पवार म्हणाले.

हेही वाचा -Hinganghat lecturer burning case : हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा, 72 पानांचे आदेश

Last Updated : Feb 10, 2022, 5:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details