महाराष्ट्र

maharashtra

CBI : उद्योगपती अविनाश भोसले यांनी कर्जाच्या नावाखाली कोट्यवधीची रक्कम लाटली; सीबीआयचा दावा

By

Published : Jul 26, 2022, 11:00 PM IST

26 मे रोजी अविनाश भोसले ( industrialist Avinash Bhosle ) यांना सीबीआयने पुण्यातून अटक केली होती, सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. येस बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राणा कपूर यांनी डीएचएफएल समूहाचे प्रवर्तक कपिल आणि धीरज वाधवानसोबत डीएचएफएलला आर्थिक साहाय्य केले आहे. येस बँकेने एप्रिल ते जून 2018 या काळात डीएचएफएलमध्ये अल्पमुदतीच्या नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचरमध्ये 3983 कोटी गुंतवले होते. तसेच, येस बँकेने डीएचएफएलची समूह कंपनी असलेल्या आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सला वांद्रे येथील प्रकल्पासाठी 750 कोटींचे आणखी कर्ज मंजूर केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.

industrialist Avinash Bhosle
अविनाश भोसले

मुंबई -डीएचएफएल आणि येस बँक प्रकरणातील आरोपी पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले यांच्या विरोधात सीबीआयने सोमवारी आरोप पत्र दाखल केले आहे. या आरोप पत्रामध्ये असे म्हटले आहे की अविनाश भोसले यांनी कर्जाच्या नावाखाली बँकांकडून कोट्यवधीची रक्कम लाटल्याचा आरोप सीबीआयकडून आरोपपत्र करण्यात आले आहे.

कर्ज घेतल्याचा आरोप -26 मे रोजी अविनाश भोसले यांना सीबीआयने पुण्यातून अटक केली होती, सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. येस बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राणा कपूर यांनी डीएचएफएल समूहाचे प्रवर्तक कपिल आणि धीरज वाधवानसोबत डीएचएफएलला आर्थिक साहाय्य केले आहे. येस बँकेने एप्रिल ते जून 2018 या काळात डीएचएफएलमध्ये अल्पमुदतीच्या नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचरमध्ये 3983 कोटी गुंतवले होते. तसेच, येस बँकेने डीएचएफएलची समूह कंपनी असलेल्या आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सला वांद्रे येथील प्रकल्पासाठी 750 कोटींचे आणखी कर्ज मंजूर केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.

कपिल वाधवानने डीएचएफएलच्या माध्यमातून राणा कपूर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना येस बँकेकडून कर्जाच्या नावाखाली 600 कोटी रुपये दिल्याचा आरोप आहे. तर भोसले यांना तीन प्रकल्पांसाठी 2018 मध्ये 68 कोटी रुपये मिळवून दिले. त्यातील अ‍ॅव्हेन्यू 54 आणि वन महालक्ष्मी हे दोन प्रकल्प बांधकाम व्यावसायिक संजय छाब्रियांनी डेव्हलप केले आहेत. भोसलेंना वरळी येथील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातही सल्ला शुल्क रक्कम मिळाली होती. प्रकल्पाचा खर्च वास्तुविशारद आणि अभियांत्रिकी आराखडा करार वित्तीय मूल्यांकन व संरचना आदींबाबत भोसलेंच्या कंपन्यांकडून सल्ला देण्यात आल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

नेमके प्रकरण काय -पुण्याचे बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना काल गुरुवारी रात्री CBI कडून अटक करण्यात आली. DHFL प्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. यातूनच त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली. गेल्या वर्षी जून 2021 मध्ये अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यांच्या नावावर असलेली तब्बल 40 कोटी 34 लाख रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली होती. विदेशी मुद्रा प्रबंधन अधिनियमांतर्गत ही कारवाई करण्यात आली होती. DHFL घोटाळा प्रकरणानंतर त्यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. अविनाश भोसले आज कोट्यवधी रुपयांच्या एबीआयएल ग्रुपचे मालक आहेत. रिअल इस्टेट किंग अशी त्यांची पुण्यामध्ये ओळख आहे. अविनाथ भोसले यांच्या ओळखीतील लोक सांगतात की 80 च्या दशकात ते रिक्षा चालवत असत. बांधकाम व्यवसायात आल्यानंतर सुरुवातीला कंत्राटदार ते आता पुण्यातील रिअल इस्टेट किंग अशी त्यांची ओळख आहे.

हेही वाचा -Devendra Fadnavis : 'आदित्य ठाकरेंकडे असलेल्या विभागाची नव्हे महाविकास आघाडी सरकारच्या 400 निर्णयांची पडताळणी सुरु, तर ठाकरेंची मुलाखत फिक्स मॅच

ABOUT THE AUTHOR

...view details