ETV Bharat / city

Devendra Fadnavis : 'आदित्य ठाकरेंकडे असलेल्या विभागाची नव्हे महाविकास आघाडी सरकारच्या 400 निर्णयांची पडताळणी सुरु, तर ठाकरेंची मुलाखत फिक्स मॅच'

author img

By

Published : Jul 26, 2022, 5:40 PM IST

Updated : Jul 26, 2022, 6:55 PM IST

फक्त आदित्य ठाकरेंच्या विभागाचेच नाही, तर अन्य विभागांच्या कामांचीही पडताळणी केली जाणार आहे. मागील सरकारने ४०० जीआर काढले होते. त्याची पडताळणी होणारच, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांनी सांगितले. तर उद्धव ठाकरेंची मुलाखत हे मॅच फिक्स असल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

मुंबई - आदित्य ठाकरे यांच्या पर्यटन विभागाच्या कामानाच नाही तर अन्य विभागांच्या कामांचीही पडताळणी सुरू आहे. शेवटच्या दिवसांत त्या सरकारने ४०० जीआर काढले होते. त्याची पडताळणी होणारच, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तर उद्धव ठाकरेंची मुलाखत हे मॅच फिक्स असल्याचेही देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) म्हणाले. अतिवृष्टीच्या संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आहे. याचा पुन्हा आढावा आम्ही सगळे घेणार आहोत. सगळ्या जिल्ह्यांचे जे काही सर्वेक्षण आहे त्याच्यावर आधारित आम्ही निर्णय निश्चितपणे करू आणि अजित दादांच्या सरकारने जो काही निर्णय केला होता त्याच्यापैक्षा अधिक चांगला निर्णय कसा करता येईल याबाबत आम्ही प्रयत्न करून असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोनिया गांधी यांना ईडीने चौकशीसाठी बोलावल्यानंतर काँग्रेसने आज ( मंगळवारी ) राज्यभरात आंदोलन केले. यासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ते संपूर्ण आंदोलन हे फक्त नेत्यांना दाखवण्याकरता होत आहे. प्रत्येक जण आपला फोटो कसा येईल एवढा पुरत ते आंदोलन करत आहे. आम्ही पण तुमच्या पाठीशी आहोत, आम्ही काहीतरी केला आहे. हे दाखवण्यासाठी हे आंदोलन त्याच्याकडे फार लक्ष द्यायची गरज नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. मी फिक्स मॅच पाहत नाही. लाईव्ह मॅच मी बघत असतो खरी माहिती बघत असतो. काही दिवसांनी जेव्हा सगळ्या गोष्टी समोर येतील तेव्हा प्रतिक्रिया देऊ, असेही फडणवीस म्हणाले.


सन्माननीय विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी असा आरोप केला की संभाजी महाराजांच्या समाधीच्या संदर्भातल्या कामांवर स्थगिती दिली आहे. कुठली स्थगितीने दादांसारख्या व्यक्तीने तरी असा आरोप करताना बघायला पाहिजे होते की फाईलवर काय लिहिले आहे. मी स्वतः माझ्या हस्तक्षरात लिहिले या कामाला स्थगिती देणे योग्य होणार नाही. उलट या संदर्भात काय काय काम घेतली आहेत. त्या कामांचे एक सादरीकरण करा, हे मुख्यमंत्र्यांसह आणि माझ्यासमोर करावे त्यात काही कामे राहिली असतील तर त्यांचा समावेश करण्यात येईल, असेही फडणवीस म्हणाले.

हेही वाचा - Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीची फडणवीसांनी उडवली खिल्ली; म्हणाले, 'मी फिक्स मॅच बघतच नाही'

Last Updated :Jul 26, 2022, 6:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.