महाराष्ट्र

maharashtra

Corona Update - राज्यात 536 नवे रुग्ण, 21 रुग्णांचा मृत्यू

By

Published : Nov 29, 2021, 8:31 PM IST

राज्यात सोमवारी (दि. 29) 536 नव्या कोरोनाग्रस्त ( Corona Update ) नोंद झाली आहे. तर आज  21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 853 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.7 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.

Corona Update
Corona Update

मुंबई- राज्यात सोमवारी (दि. 29) 536 नव्या कोरोना रुग्णांची ( Corona Update ) नोंद झाली आहे. तर आज 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 853 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.7 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.

7 हजार 854 सक्रिय रुग्ण -

आज राज्यात 536 नवीन कोरोनाग्रस्त निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाख 34 हजार 980 वर पोहोचला आहे. तर आज 21 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 40 हजार 962 वर पोहोचला आहे. आज 853 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 82 हजार 493 वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.7 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 54 लाख 20 हजार 117 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 10.14 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 85 हजार 800 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 7 हजार 854 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

या विभागात सर्वाधिक रुग्ण -

मुंबई महापालिका- 110

ठाणे- 57

अहमदनगर- 53

पुणे- 35

पुणे पालिका - 53

पिंपरी चिंचवड पालिका - 15

या दिवशी दिवशी कमी रुग्णांची नोंद -

25 ऑक्टोबरला घट होऊन 889, 1 नोव्हेंबरला 809, 5 नोव्हेंबरला 802, 6 नोव्हेंबरला 661, 7 नोव्हेंबरला 892, 8 नोव्हेंबरला 751, 9 नोव्हेंबरला 982, 11 नोव्हेंबरला 997, 22 नोव्हेंबरला 656, 23 नोव्हेंबरला 766, 25 नोव्हेंबरला 848, 26 नोव्हेंबरला 852, 28 नोव्हेंबरला 832, 29 नोव्हेंबरला 536, असे सर्वात कमी नवे रुग्ण आढळून आले आहेत.

हे ही वाचा -Omicron : राज्यात एकही रुग्ण नाही, आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर बंदीची मागणी तर परदेशी पर्यटकांची होणार जिनोम टेस्ट

ABOUT THE AUTHOR

...view details