Omicron : राज्यात एकही रुग्ण नाही, आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर बंदीची मागणी तर परदेशी पर्यटकांची होणार जिनोम टेस्ट

author img

By

Published : Nov 27, 2021, 7:25 PM IST

Updated : Nov 27, 2021, 8:09 PM IST

corona file photo
कोरोना फाईल फोटो ()

कोरोनाचा एक नवा आणि आतापर्यंतचा सर्वाधिक म्युटेशन झालेला विषाणू आढळला आहे. या नव्या B.1.1.529 विषाणूला जागतिक आरोग्य संघटनेने ओमिक्रॉन (Omicron) हे ग्रीक नाव दिले आहे. या विषाणूचा समावेश WHO ने 'Variant of Concern' म्हणजेच काळजी करण्याजोग्या व्हेरियंटच्या यादीत केला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नवीन नियम लागू केले आहेत. तसेच आफ्रिकेतून राज्यात येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्याची मागणी आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी केली आहे.

मुंबई - कोरोनाचा एक नवा आणि आतापर्यंतचा सर्वाधिक म्युटेशन झालेला विषाणू दक्षिण आफ्रिकेत आढळला आहे. या नव्या B.1.1.529 विषाणूला जागतिक आरोग्य संघटनेने ओमिक्रॉन - Omicron हे ( New Covid Variant Omicron ) ग्रीक नाव दिले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नवीन नियम व अटी ( Maharashtra Govt fresh rules ) लागू केल्या आहेत. तसेच आफ्रिकेतून महाराष्ट्रात येणारी विमाने रद्द करण्याची मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांनी केंद्र सरकारला केली आहे.

  • आफ्रिकेतून महाराष्ट्रात येणारी विमानं रद्द करा - राजेश टोपे
    आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनाचा नवा व्हेरियंट दक्षिण आफ्रिकेत ( Africa new Corona Variant ) आढळला आहे. आपल्या देशात या व्हेरियंटचा अजून एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, व्हेरियंट फारच धोकादायक असेल तर आफ्रिकेतून महाराष्ट्रात होणारी विमान वाहतूक रद्द ( Air Transport Cancellation Demand ) करा अशी मागणी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केली असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांनी जालन्यात सांगितले आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारच्या नवीन नियम आणि अटी जाहीर केल्या आहेत.

संबंधित बातमी वाचा येथे - Health Minister Rajesh Tope : अफ्रिकेतील विमानांवर मुंबईत बंदी घालण्याची आरोग्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी

  • महाराष्ट्र सरकारच्या नवीन नियम आणि अटी जाहीर -

आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनंतर नवीन नियम आणि अटी जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये विदेशात प्रवास करून आलेल्या प्रवाशांना संपूर्ण लसीकरण आणि 72 तासात केलेली RT-PCR चाचणी आवश्यक असणार आहे.

संबंधित बातमी वाचा येथे - Maharashtra Govt fresh rules कोरोनाच्या काळात राज्य सरकारचे पुन्हा नवीन निर्बंध, परराज्यातून येणाऱ्या प्रवाशाकरिता हे आहेत नियम

  • मुंबईत येणाऱ्या परदेशी पर्यटकांची होणार जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी - महापौर पेडणेकर

मुंबईमधील कोरोना विषाणूचा प्रसार आटोक्यात येत असतानाच युरोप आणि दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट ( Covid New Variant ) आढळला आहे. मुंबईमध्ये परदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. मुंबईत नव्या व्हेरियंटचा प्रसार होऊ नये, यासाठी परदेशातून येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी (Genome Sequencing Test) केली जाणार आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना क्वारंटाईन करण्याचा पालिकेचा विचार आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. तसेच नव्या व्हेरियंटचा (Covid New Variant) सामना करण्यासाठी सज्ज होऊ, असे आवाहन महापौरांनी नागरिकांना केले आहे.

संबंधित बातमी वाचा येथे - Omicron Covid New Variant : मुंबईत येणाऱ्या परदेशी पर्यटकांची होणार जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी - महापौर

  • नवीन विषाणू धोकादायक - डॉ. अविनाश भोंडवे
    माहिती देताना डॉ. अविनाश भोंडवे

बी १.१.५२९ हा दक्षिण आफ्रिकेच्या बोसनावामधून ( Omicron found in South Africa ) निर्माण झालेला विषाणू हा संपूर्ण जगात चिंता निर्माण करत आहे. या विषाणूची वैशिष्टय म्हणजे यात ३० पेक्षा जास्त म्युटेशन झाली आहेत. देशात पसरलेला डेल्टा विषाणूमध्ये फक्त दोनच म्युटेशन होते. नवीन विषाणूत मात्र ३० म्युटेशन आहेत. हा विषाणू खूप जास्त वेगाने पसरत आहे. जर भारतात हा विषाणू वेगाने पसरला तर पुन्हा लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होईल, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे ( Dr. Avinash Bhondave on Omicron ) म्हणाले.

संबंधित बातमी वाचा येथे - New Covid Variant Omicron : नवीन विषाणूत 30 पेक्षा जास्त म्युटेशन, वेगाने पसरतो - डॉ. अविनाश भोंडवे

Last Updated :Nov 27, 2021, 8:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.