महाराष्ट्र

maharashtra

Railway Officers Corona Infected : मध्य रेल्वेचे ५० पेक्षा जास्त अधिकारी कोरोनाबाधित; कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे रेल्वेचे कामकाज

By

Published : Jan 16, 2022, 8:25 PM IST

पश्चिम आणि मध्य रेल्वेवर सरासरी ८०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसापूर्वी पाचव्या सहाच्या मार्गिकेचा कामासाठी मेगाब्लॉक घेतला होता. यावेळी मध्य रेल्वेचे कर्मचारी आणि अधिकारी यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जास्त संपर्क आला होता. त्यामुळे हा मेगाब्लॉक कोरोना हॉटस्पॉट तर ठरला नाही ना? अशी चर्चा रेल्वेच्या अधिकाऱ्यांमध्ये सुरु आहे.

मध्य रेल्वे प्रातिनिधीक फोटो
मध्य रेल्वे प्रातिनिधीक फोटो

मुंबई -गेल्या काही दिवसांत कोरोना आणि ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत असल्यामुळे कोरोना रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत आहे. आता कोरोना विषाणूचा शिरकाव मध्य आणि पश्चिम रेल्वेत सुद्धा झाला आहे. मध्य रेल्वेमध्ये ३१ अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर पश्चिम आणि मध्य रेल्वेवर सरासरी ८०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसापूर्वी पाचव्या सहाच्या मार्गिकेचा कामासाठी मेगाब्लॉक घेतला होता. यावेळी मध्य रेल्वेचे कर्मचारी आणि अधिकारी यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जास्त संपर्क आला होता. त्यामुळे हा मेगाब्लॉक कोरोना हॉटस्पॉट तर ठरला नाही ना? अशी चर्चा रेल्वेच्या अधिकाऱ्यांमध्ये सुरु आहे.

एक हजारपेक्षा जास्त कोरोनाबांधित

मुंबईत दरदिवशी हजारोंच्या संख्येने कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे राज्य सरकारद्वारे सरकारी आणि खासगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होम आणि दिवसाआड काम करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, अद्याप रेल्वेचे काही विभाग सोडल्यास उर्वरित सर्व विभागात शंभर टक्के कर्मचारी वर्ग काम करत आहे. परिणामी कोरोनाची साखळी मजबूत होण्यास मदत होत आहे. सध्या रेल्वेच्या प्रत्येक वर्कशॉप, विभागात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना कोरोनाची बाधा होत आहे. सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वेचा मुंबई विभागात जवळ जवळ १ हजारहुन अधिक कर्मचारी- अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. गेल्या काही दिवसापूर्वी मध्य रेल्वेवरील ठाणे ते दिवा पाचवी आणि सहावी मार्गिकेच्या कामासाठी मध्य रेल्वे ठाणे ते कळवा स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गांवर ३६ तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे. या कामासाठी कर्मचारी आणि अधिकारी यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जास्त संपर्क आला होता. त्यामुळे हा मेगाब्लॉक कोरोना हॉटस्पॉट तर ठरला नाही ना ?अशी रेल्वेच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा आहे.

१० अधिकारी पुन्हा कामावर

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाचा तिसऱ्या लाटेत मध्य रेल्वेच्या ५० वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी क्वॉरनटाइन कालावधी पूर्ण करून १० अधिकारी पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. तर ४० कर्मचारी घरी किंवा रुग्णालयात उपचार घेत आहेत. यामध्ये विभागीय रेल्वे व्यवस्थापकांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर मध्य रेल्वेच्या ५०० हुन आणि पश्चिम रेल्वेच्या ५०० हुन अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वे वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे.

वर्कशॉपमध्ये सार्वधिक कोरोनाबांधित

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वे आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने पश्चिम रेल्वेच्या वर्कशाॅपमधील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे. महालक्ष्मी वर्कशाॅपमध्ये ५७८ जणांची चाचणी केली असता, १९४ कोरोना पाॅझिटिव्ह मिळाले आहेत. लोअर परळ वर्कशाॅपमध्ये ५१४ जणांची चाचणी केली असता, १४५ कोरोना पाॅझिटिव्ह मिळाले आहेत. याशिवा लोअर परळ डिस्पेसरीमधील ८ जण कोरोना पाॅझिटिव्ह सापडून आले आहे. सध्या पश्चिम रेल्वेच्या जगजीवन राम रुग्णालयात कोरोना रुग्णावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा -Death on Railway Track : रेल्वे मार्गावरील अपघात रोखण्यात रेल्वे प्रशासन अपयशी; गेल्या वर्षी एक हजार ११४ जणांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details