ETV Bharat / state

Death on Railway Track : रेल्वे मार्गावरील अपघात रोखण्यात रेल्वे प्रशासन अपयशी; गेल्या वर्षी एक हजार ११४ जणांचा मृत्यू

author img

By

Published : Jan 16, 2022, 6:04 PM IST

Updated : Jan 16, 2022, 6:42 PM IST

मुंबईच्या उपनगरीय रेल्वेमार्गावर होणाऱ्या एकूण अपघाती मृत्यूंपैकी निम्म्यापेक्षा जास्त मृत्यू रेल्वे रूळ ओलांडताना होतात. ( Death at Railway Track Crossing ) गेल्यावर्षी रुळ ओलांडताना लाेकल, मेल-एक्सप्रेसची धडक लागल्याने एक हजार ११४ जणांचा मृत्यु झाला. ( More than one thousand people died at railway track ) मात्र, तरीसुद्धा या अपघात रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन अपयशी ठरत आहे. ( Railway Administration Failed ) संरक्षण भिंतीचे काम पूर्ण झाल्यास प्रवाशांच्या आणि रेल्वे रुळांच्या सुरक्षेत वाढ होईल. मात्र, रेल्वे कोरोनाचे कारण देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी केला आहे.

Railway track
रेल्वे रुळ

मुंबई - मुंबईच्या उपनगरीय रेल्वेमार्गावर होणाऱ्या एकूण अपघाती मृत्यूंपैकी निम्म्यापेक्षा जास्त मृत्यू रेल्वे रूळ ओलांडताना होतात. ( Death at Railway Track Crossing ) गेल्यावर्षी रुळ ओलांडताना लाेकल, मेल-एक्सप्रेसची धडक लागल्याने एक हजार ११४ जणांचा मृत्यु झाला. ( More than one thousand people died at railway track ) मात्र, तरीसुद्धा या अपघात रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन अपयशी ठरत आहे. ( Railway Administration Failed ) आतापर्यत अनेक ठिकाणी रेल्वेची संरक्षण भिंती काम अपूर्ण आहे. त्यामुळे दिवसेंदिवस रेल्वे रूळ ओलांडताना होणाऱ्या अपघाताची संख्या वाढली आहे. याबाबत 'ईटीव्ही भारत'चा हा विशेष अहवाल. ( ETV Bharat Special Report on Death on Railway Track )

उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख याबाबत बोलताना

या मृत्यूंना जबाबदार कोण?

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर रूळ ओलांडताना आणि लोकलमधून पडून होणाऱ्या अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे. रूळ ओलांडण्याचे प्रकार रोखण्याचे मोठे आव्हान रेल्वे प्रशासनासमोर आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळ, मध्य व पश्चिम रेल्वेने हे प्रकार रोखण्यासाठी रुळांशेजारी संरक्षक भिंत बांधणे, दोन रुळांच्या मार्गामध्ये संरक्षक जाळी, स्थानकात पादचारी पूल बांधणे, प्रवेशद्वार बांधण्याचे काम केले. मात्र, तरीही गेल्या काही वर्षांमध्ये हे अपघात कमी झालेले नाहीत. २०२१मध्ये रेल्वे रुळ ओलांडताना लोकल तसेच एक्स्प्रेस गाड्यांची धडक बसून आणि लोकलमधून पडून होणाऱ्या अपघातांत वाढ झाली आहे. २०२०मध्ये रूळ ओलांडताना ७३० जणांचा मृत्यू आणि १२९ जखमी झाले हाेते. तर लोकल तसेच एक्सप्रेस गाड्यांतून पडून १७७ जण दगावले तर ३६१ जण जखमी झाले. त्याउलट २०२१ मध्ये अपघातांत वाढ झाली. गेल्या वर्षी रेल्वे रूळ ओलांडताना लोकल तसेच एक्सप्रेस गाड्यांची धडक बसून तब्बल एक हजार ११४ जणांचा मृत्यू झाला. त्यात मध्य रेल्वेवर ७४८ तर पश्चिम रेल्वेवर ३६६ जणांनी आपला जीव गमावला आहे. दर वर्षी या अपघातांची संख्या वाढत जात आहे.

संरक्षण भिंतीच कामाला केव्हा गती मिळणार -

एमयुटीपी तीन अंतर्गत सीएसएमटी ते कर्जतदरम्यान तीन हजार ३७० मीटर अर्थात तीन किमीची भिंत बांधण्यात येणार आहे. या कामासाठी अंदाजे २ कोटी ४९ लाख येणार आहे. एमयुटीपी तीन प्रकल्पास राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. या संरक्षण भिंतीचा अर्धा खर्च राज्य सरकारकडून केला जाणार आहे. आज या गोष्टीला तीन वर्ष होत आहे. मात्र, प्रत्यक्षात कामाला गती मिळत नाही. दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी सर्रासपणे रेल्वे रूळ ओलांडत आहे. वर्षभरामध्ये शेकडो प्रवाशांचा रेल्वे रूळ ओलांडताना मृत्यू होत आहे. संरक्षण भिंतीचे काम पूर्ण झाल्यास प्रवाशांच्या आणि रेल्वे रुळांच्या सुरक्षेत वाढ होईल. मात्र, रेल्वे कोरोनाचे कारण देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख ( Nandkumar Deshmukh Railway Federation ) यांनी केला आहे.

हेही वाचा - CM Uddhav Thackeray : "जागतिक पातळीवर भारतीय संघाचा दरारा..."; मुख्यमंत्री ठाकरेंच्या हस्ते फुटबॉल स्टेडियमचे उद्घाटन

एक हजार ११४ जणांचा मृत्यू -

रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०१९पासून आतापर्यत मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रेल्वे रूळ ओलांडताना २ हजार ६७५ जणांचा मृत्यू झालेला आहे. २०१९मध्ये रेल्वे रूळ ओलांडताना उपनगरीय रेल्वेवर १ हजार ४५५ जणांचा मृत्यू आणि २७६ जखमी झाले होते. तर २०२०मध्ये ७३० जणांचा मृत्यू आणि १२९ जखमी आणि चालू वर्षात ४९० प्रवाशांच्या मृत्यू झालेला आहे. दररोज किमान ९ ते १० अपघात होतात. यामध्ये रेल्वे रुळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांची संख्या सर्वाधिक आहे. लॉकडाऊन असल्याने २०२०मध्ये रूळ ओलांडताना ७३० जणांचा मृत्यू आणि १२९ जखमी झाले हाेते. मात्र, २०२१ मध्ये रेल्वे रूळ ओलांडताना लोकल तसेच एक्सप्रेस गाड्यांची धडक बसून तब्बल १ हजार ११४ जणांचा मृत्यू झाला. दररोज किमान ९ ते १० अपघात होतात.

Last Updated :Jan 16, 2022, 6:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.