महाराष्ट्र

maharashtra

राज्यात रुग्णसंख्या स्थिर; 3 हजार 206 नवे कोरोना रुग्ण आढळले, 36 रुग्णांचा मृत्यू

By

Published : Sep 26, 2021, 8:06 PM IST

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. रोज तीन ते चार हजार रुग्ण आढळून येत आहेत. काल शनिवारी 3 हजार 276 तर, आज रविवारी 26 सप्टेंबरला 3 हजार 206 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

मुंबई -राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. रोज तीन ते चार हजार रुग्ण आढळून येत आहेत. काल शनिवारी 3 हजार 276 तर, आज रविवारी 26 सप्टेंबरला 3 हजार 206 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा -पुढील पाच दिवस पावसाचे.. राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, विदर्भ आणि मराठवाड्याला ऑरेंज अॅलर्ट

काल शनिवारी 58 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आज त्यात घट होऊन 36 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आज 3 हजार 292 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.24 टक्के तर, मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे. राज्यात रुग्णसंख्या स्थिर असून मृत्यूसंख्येत किंचित घट झाली आहे.

37,860 सक्रिय रुग्ण

आज राज्यात 3 हजार 206 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 65 लाख 44 हजार 325 वर पोहोचला आहे. तर, आज 36 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 38 हजार 870 वर पोहोचला आहे. आज 3 हजार 292 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 63 लाख 64 हजार 27 वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.24 टक्के तर, मृत्यूदर 2.12 टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 81 लाख 58 हजार नमुन्यांपैकी 65 लाख 44 हजार 325 नमुने म्हणजेच, 11.25 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 61 हजार 72 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून 37 हजार 860 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

रुग्ण, मृत्यूसंख्येत चढउतार

26 ऑगस्टला 5 हजार 108, 9 सप्टेंबरला 4 हजार 219, 11 सप्टेंबरला 3 हजार 75, 20 सप्टेंबरला 2 हजार 583, 21 सप्टेंबरला 3 हजार 131, 22 सप्टेंबरला 3 हजार 608, 23 सप्टेंबरला 3 हजार 286, 24 सप्टेंबरला 3 हजार 276, 26 सप्टेंबरला 3 हजार 292 रुग्ण आढळून आले आहेत. तर, 28 जुलैला 286, 2 सप्टेंबरला 55, 6 सप्टेंबरला 37, 20 सप्टेंबरला 28, 21 सप्टेंबरला 70, 22 सप्टेंबरला 48, 23 सप्टेंबरला 51, 24 सप्टेंबरला 58, 26 सप्टेंबरला 36 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात रुग्ण आणि मृत्यू संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण

मुंबई महापालिका - 477
कल्याण डोंबिवली - 85
रायगड - 92
अहमदनगर - 680
पुणे - 446
पुणे पालिका - 141
पिंपरी चिंचवड पालिका - 119
सोलापूर - 190
सातारा - 135
सांगली - 95

हेही वाचा -'गुलाब' चक्रीवादळाचा महाराष्ट्रावरही प्रभाव; राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता

ABOUT THE AUTHOR

...view details