महाराष्ट्र

maharashtra

Aditya Thackeray In Kolhapur: बंडखोर आमदारांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी - आदित्य ठाकरे

By

Published : Aug 2, 2022, 7:05 PM IST

शिवसेनेमध्ये झालेल्या पक्ष फुटीनंतर युवासेना प्रमुख तसेच शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे आता महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. शिव संवाद यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जात शिवसैनिकांसोबत संवाद साधत असून या माध्यमातून आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदार आणि खासदारांवर निशाणा साधत आहेत.

ि
ि

कोल्हापूर - शिवसेनेमध्ये झालेल्या पक्ष फुटीनंतर युवासेना प्रमुख तसेच शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे आता महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. शिव संवाद यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जात शिवसैनिकांसोबत संवाद साधत असून या माध्यमातून आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदार आणि खासदारांवर निशाणा साधत आहेत.

दवाखान्यात होते तेव्हा पासून हा कट - आज त्यांची शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर येथे जाहीर सभा पार पडली यावेळी त्यांनी बंडखोर आमदार आणि खासदारांवर जोरदार टीका केली आहे. बंड केला ठीक आहे पण हिम्मत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवून दाखवा असे आव्हान बंडखोर नेत्यांना दिला आहे. तसेच ठाकरे ना संपवण्यासाठी जेव्हा उध्दव ठाकरे दवाखान्यात होते तेव्हा पासून हा कट रचला जात होता असे ही ते म्हणाले आहेत. दरम्यान सभेनंतर त्यांनी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे जाऊन दत्ताचे दर्शन घेतले.


शिवसैनिकांमध्ये देखील जोश - युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची शिव संवाद यात्रा कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर येथे सभा पार पडली. कार्यकर्त्यांची उत्सुकता पाहून आदित्य ठाकरे देखील थेट कार्यकर्त्यांनमध्ये जात भाषणाला सुरुवात केली. यावेळी आदित्य ठाकरे बंडखोर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि खासदार धैर्यशील माने यांच्यावर जोरदारपणे बरसत असतनाच वरून वरून राजा ही बरसू लागला मात्र ठाकरे यांना ऐकण्यासाठी आलेले शिवसैनिक मात्र पावसात भिजत तेथेच बसून राहिले यामुळे आदित्य ठाकरे देखील भरपाऊसात भाषण सुरूच ठेवल्याने शिवसैनिकांमध्ये देखील जोश निर्माण झाला हे बंडखोर गद्दारच आहेत.

शिवसेनेने यांना लायकी पेक्षा जास्त दिले मात्र तरीही त्यांनी बंड केला आणि हा बंड सुरत वरून गुवाहाटी आणि गोव्यात गेला. एका बाजूला गुवाहाटी मध्ये महापूर आलेला असताना दुसऱ्या बाजूला हे बंड खोर आमदार तेथे नाचत होते अशी टीका त्यांनी केली.मात्र मला त्यांच्याबद्दल राग नाही मात्र त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हान त्यांनी दिले.

हेही वाचा -Disqualification Of MLA: आमदारांच्या अपात्रतेची याचिका निकाली काढण्याची मुख्यमंत्र्यांची न्यायालयाला विनंती

ABOUT THE AUTHOR

...view details