महाराष्ट्र

maharashtra

Umesh Kolhe Murder Case : अमरावती पोलीस आयुक्तांची एनआयए मार्फत चौकशी करावी - नवनीत राणा

By

Published : Jul 2, 2022, 10:14 PM IST

अमरावती शहरातील औषधी विक्रेते उमेश कोल्हे यांच्या हत्येचे प्रकरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एनआयएकडे दिल्यावर अमरावती पोलिसांनी पहिल्यांदाच या हत्या प्रकरणाचा संबंध नुपूर शर्मा यांच्याबाबत केलेल्या पोस्ट प्रकरणाशी असल्याचे म्हटले आहे. आतापर्यंत या गंभीर प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांची देखील एनआयएन चौकशी करावी अशी मागणी देखील खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या सोबत
नवनीत राणा

अमरावती -अमरावती शहरातील औषधी विक्रेते उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली आहे. ही घटना अतिशय गंभीर असून अमरावतीच्या पोलिस आयुक्त आरती सिंह यांनी या प्रकरणाला लुट मारीतून घटना घडल्याचे सांगून गंभीर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असा आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला आहे.

एनआयएकडून पोलीस आयुक्तांची चौकशी करावी -तब्बल बारा दिवसानंतर अमरावती शहरातील औषधी विक्रेते उमेश कोल्हे यांच्या हत्येचे प्रकरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एनआयएकडे दिल्यावर अमरावती पोलिसांनी पहिल्यांदाच या हत्या प्रकरणाचा संबंध नुपूर शर्मा यांच्याबाबत केलेल्या पोस्ट प्रकरणाशी असल्याचे म्हटले आहे. आतापर्यंत या गंभीर प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांची देखील एनआयएन चौकशी करावी अशी मागणी देखील खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.

नवनीत राणांची प्रतिक्रिया

अमित शहा यांचे आभार - उदयपूर येथील घटनेप्रमाणेच अमरावती शहरात नुपूर शर्मा यांच्या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या औषधी विक्रेते उमेश कोल्हे यांची हत्या झाल्याचे अमरावती पोलिसांनी बऱ्याच उशिरा का होईना मात्र स्पष्ट केले आहे. या प्रकरणाचा तपास ए एन आई च्या वतीने करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शर्मा यांनी दिले असून त्यांचे आभार व्यक्त करते असे देखील खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -Umesh Kolhe Murder Case: कोल्हेंनी गाडी थांबवली अन् त्याने क्षणार्धात गळा चिरला; वाचा त्या रात्रीची थरारक कहाणी

नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्या हत्या झाल्याचा पोलिसांचा दावा - अमरावतीतील 55 वर्षांच्या मेडिकल चालकाची हत्या करण्यात आली. उमेश कोल्हे असे या मेडिकल चालकाचे नाव आहे. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने ही हत्या केल्याचा आरोप भाजपने केला. त्यानंतर याप्रकरणाबाबात पोलीस उपायुक्तांनी मोठी प्रतिक्रिया व्यक्त केली. कोल्हे यांची हत्या ( Umesh Kolhe Murder Case ) नुपूर शर्मांबाबात समाज माध्ममावर केलेल्या पोस्टमुळेच करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी स्पष्ट केले आहे. हत्या प्रकरण 21 जूनच्या रात्रीचे आहे. हत्या झाली तेव्हा त्यांच्या जवळील मुद्देमाल तसाच होता त्यामुळे या हत्ये पाठीमागे लुटपाट करण्याचा हेतु नव्हता हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे हत्येच्या कारणांवरचा सस्पेन्स कायम होता. अखेर ही हत्या नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ केलेल्या पोस्टमुळे झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.

काय आहे प्रकरण? -शहरातील उमेश कोल्हे ( रा. घनश्यामनगर ) या मेडिकल व्यावसायिकाची चाकून गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. 21 जून रोजी ही धक्कादायक घटना घडली होती. कोल्हे यांचे तहसील कार्यालय परिसरात मेडिकल स्टोअर्स आहे. मंगळवारी रात्री त्यांनी मेडिकल स्टोअर्स बंद केले. त्यानंतर ते मुलगा संकेत (२७) व सून वैष्णवी यांच्यासोबत घरी जायला निघाले. समोर एका दुचाकीवर उमेश तर मागे दुसऱ्या दुचाकीवर मुलगा संकेत व त्यांची पत्नी वैष्णवी जात होते. न्यू हायस्कूल मेन समोरील गल्लीतून जात असताना एका दुचाकीजवळ तीन जण उभे होते. त्यातील एकाच्या हातात चाकू होता. ते तिघेही अचानक उमेश यांच्या दुचाकीच्या आडवे झाले.

हेही वाचा -Amravati Chemist Murder : उमेश कोल्हेंची हत्या नुपूर शर्मांबाबत केलेल्या पोस्टमुळेच; पोलीस उपायुक्तांनी केलं स्पष्ट

मुलांसमोरच चिरला गळा -उमेश यांची गाडी जवळ येताच त्या तिघांनी त्यांना अडवे आले त्यामुळे उमेश यांनी त्यांची दुचाकी थांबवली. त्याचवेळी कोणाला काही कळायच्या आत ज्याच्या हातात चाकू होता त्याने अगदी सऱ्हाईतपणे त्यांच्या गळ्यावर चाकु चालवला. क्षणार्धात उमेश यांना मोठा रक्तश्राव सुरु झाला आणि ते त्याच अवस्थेत रस्त्यावर कोसळले. पाठीमागुन येत असलेल्या संकेत आणि वैष्णवी यांच्या समोरच उमेश यांचा गळा चिरला गेला आणि ते पडले वार इतका मोठा होता की उमेश यांना जागेवरुन हालताही आले नाही. कोणाला काही कळायच्या आत हा प्रकार घडला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details