ETV Bharat / state

Umesh Kolhe Murder Case: कोल्हेंनी गाडी थांबवली अन् त्याने क्षणार्धात गळा चिरला; वाचा त्या रात्रीची थरारक कहाणी

author img

By

Published : Jul 2, 2022, 7:31 PM IST

Updated : Jul 2, 2022, 7:44 PM IST

मुलगा सुन यांच्या सोबत दुकान बंद करुन उमेश कोल्हे (Umesh Kolhe Murder Case) घराकडे निघाले मुलगा आणि सुन मागुन येत होते. हायस्कुलच्या गेट जवळ मारेकऱ्यांनी त्यांना अडवले त्यांनी गाडी थांबवली ( Kolhe stopped the scooter) येताच गाडी येताच आधिच तेथे उपस्थित असलेल्या मारेकऱ्यांनी क्षणार्धांत उमेश यांचा गळा चिरला (slit his throat in a moment) आणि ते पसार झाले. वाचा त्या रात्रीची कहानी (Read the story of that night)...

Umesh Kolhe Murder Case
उमेश कोल्हे खून प्रकरण

अमरावती: अमरावतीतील 55 वर्षांच्या मेडिकल चालकाची हत्या करण्यात आली. उमेश कोल्हे असे या मेडिकल चालकाचे नाव आहे. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने ही हत्या केल्याचा आरोप भाजपने केला. त्यानंतर याप्रकरणाबाबात पोलीस उपायुक्तांनी मोठी प्रतिक्रिया व्यक्त केली. कोल्हे यांची हत्या ( Umesh Kolhe Murder Case ) नुपूर शर्मांबाबात समाज माध्ममावर केलेल्या पोस्टमुळेच करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी स्पष्ट केले आहे. हत्या प्रकरण 21 जूनच्या रात्रीचे आहे. हत्या झाली तेव्हा त्यांच्या जवळील मुद्देमाल तसाच होता त्यामुळे या हत्ये पाठीमागे लुटपाट करण्याचा हेतु नव्हता हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे हत्येच्या कारणांवरचा सस्पेन्स कायम होता. अखेर ही हत्या नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ केलेल्या पोष्ट मुळे झाल्याचे पोलीसांनी जाहिर केले.

मनमिळावू स्वभाव: शहरातील घनश्यामनगर भागात उमेश प्रल्हाद कोल्हे हे रहायचे. त्यांना तीन भाऊ मुलगा पुतने सुन असा मोठा परिवार एकत्र रहायचा. उमेश यांचे शहरातील तहसील कार्यालय परिसरात मेडीकलचे दुकान आहे. या दुकानात प्राण्यांना लागणारी औषधी तसेच खाद्यपदार्थ तसेच इतर वस्तु मिळायच्या. उमेश यांचा स्वभाव एकदम मनमिळावु होता. सगळे जण त्यांना सरळ आणि चांगला मानुस म्हणुन पहायचे त्यांचे कोणाशी वैर नव्हते. मनमिळावू स्वभावामुळे त्यांच्या सहवासातील लोक त्यांना मानायचे त्यामुळेच त्यांच्या हत्येनंतर त्यांच्या परीचितांना चांगलाच धक्का बसला. त्यांच्या अशा जाण्या बद्दल परीवारासह सर्व संबंधित हळहळ व्यक्त करत आहेत

आधिच दबा धरुन बसले होते मारेकरी: मंगळवार 21 जून रोजी रोजच्या प्रमाणे उमेश यांनी रात्री 10 नंतर दुकानातील सगळा हिशोब केला आणि गल्यातील पैसे सोबत घेऊन दुकान बंद केले. त्यांचा मुलगा संकेत आणि त्याची पत्नी म्हणजे उमेश यांची सून वैष्णवी हे पण त्यांच्या सोबत होते. सगळे एकत्रच निघाले उमेश यांची स्कुटी समोर होती तर संकेत आणि वैष्णवी त्यांच्या पाठोपाठ निघाले. घराकडे हे सगळे निघाले असताना न्यू हायस्कूल समोरच्या गल्लीत त्यांनी गाडी टाकली. त्यावेळी थोडे पुढे गेल्या नंतर त्यांना एका गाडीजवळ तीघेजण उभे असल्याचे दिसले. त्यातील एकाच्या हातात चाकू होता.

मुलांसमोरच चिरला गळा: उमेश यांची गाडी जवळ येताच त्या तीघांनी त्यांना अडवे आले त्यामुळे उमेश यांनी त्यांची दुचाकी थांबवली. त्याचवेळी कोणाला काही कळायच्या आत ज्याच्या हातात चाकू होता त्याने अगदी सऱ्हाईतपणे त्यांच्या गळ्यावर चाकु चालवला. क्षणार्धात उमेश यांना मोठा रक्तश्राव सुरु झाला आणि ते त्याच अवस्थेत रस्त्यावर कोसळले. पाठीमागुन येत असलेल्या संकेत आणि वैष्णवी यांच्या समोरच उमेश यांचा गळा चिरला गेला आणि ते पडले वार इतका मोठा होता की उमेश यांना जागेवरुन हालताही आले नाही. कोणाला काही कळायच्या आत हा प्रकार घडला होता.

आरडा ओरड करताच पळाले मारेकरी: काही क्षणात घडलेल्या या प्रकारात नेमके काय घडले हे कळायच्या आत संकेतने वडील रक्ताच्या थारोळ्यात बेशुध्द पडल्याचे पाहिले. आणि तो घाबरुन गेला. तेवढ्यात त्याने प्रसंगावधान दाखवत वडलांकडे धाव घेतली आणि मदतीसाठी आरडा ओरड करायला सुरवात केली. दरम्यान मारेकऱ्यांनी हा ओरडण्याचा आवाज एैकताच दुचाकीवरुन घटनास्थळावरुन लगेच पळ काढला. संकेतच्या ओरडण्यामुळे रस्त्यावरुन जाणारे काही लोक काय झाले हे पहायला तीकडे येउ लागले होते. पण दरम्यान मारेकऱ्यांनी पळ काढलेला होता.

उपचाराच्या वेळी सोडला जीव: दरम्यान परिसरातील नागरिकांच्या मदतीने संकेतने उमेश यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. पण उपचार सुरु असतानाच उमेश यांची प्राणज्योत मालवली होती. दरम्यान कोतवाली पोलिसांना कळवण्यात आले त्यानंतर ठाणेदार निलिमा आरज आपल्या ताफ्यासह घटनास्थळी आले. गुन्हे शाखेच्या पथकानेही पाहणी केली. या प्रकरणी संकेत यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तीन मारेकऱ्यांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. दरम्यान कोल्हे यांच्या खूनाचे कारण समोर येत नव्हते तसेच लुटपाटीतुन हा प्रकार झाल्याचेही दिसत नव्हते.

संकेतचा आखोदेखा हाल: संकेत याने पोलिसांना सांगितले की, आम्ही प्रभात चौकातून जात होतो आणि आमची स्कूटर न्यू हायस्कूलच्या गेटजवळ आली. वडिलांच्या स्कूटरसमोर दुचाकीवरून दोन माणसे आली. त्यापैकी एकाच्या हातात चाकू होता. त्यांच्यापैकी एकाने वडिलांच्या गळ्यावर वार केला. वडील जमिनीवर पडले आणि त्यांच्या मानेतून रक्तस्त्राव झाला. मी माझी स्कूटर थांबवली आणि मदतीसाठी ओरडू लागलो. दुसरा माणूस आला आणि तिघे दुचाकीवर बसले आणि तेथून पळून गेले. इतरांच्या मदतीने वडलांना जवळच्या रुग्णालयात नेले दरम्यान त्याच रात्री त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा : Amravati Chemist Murder : उमेश कोल्हेंची हत्या नुपूर शर्मांबाबत केलेल्या पोस्टमुळेचं; पोलीस उपायुक्तांनी केलं स्पष्ट

Last Updated :Jul 2, 2022, 7:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.