महाराष्ट्र

maharashtra

सलग ५ व्या सत्रात शेअर बाजार निर्देशांक ४५३ अंशाने वधारून बंद; ब्रेक्झिट कराराचा परिणाम

By

Published : Oct 17, 2019, 5:17 PM IST

अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आणखी आर्थिक सुधारणा जाहीर करण्याचे  संकेत दिले आहेत. तसेच त्यांनी  जागतिक गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्याची विनंती केली आहे. यामुळे देशातील गुंतवणूकदार उत्साहित झाले आहेत.

संग्रहित - शेअर बाजार

मुंबई- शेअर बाजार निर्देशांक सलग पाचव्या सत्रात ४५३ अंशाने वधारून ३९,०५२.०६ वर स्थिरावला. इंग्लंड आणि युरोपियन युनियन यांच्यात ब्रेक्झिटसंदर्भात आज करार झाला आहे. यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्याचा मुंबई शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम झाला आहे.

अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आणखी आर्थिक सुधारणा जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत. तसेच त्यांनी जागतिक गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्याची विनंती केली आहे. यामुळे देशातील गुंतवणूकदार उत्साहित झाले आहेत.

शेअर बाजार बंद होताना निर्देशांक ४५३.०७ अंशाने वधारून ३९,०५२.०६ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक १२२.३५ अंशाने वधारून ११,५८६.३५ वर पोहोचला.

या कंपन्यांचे शेअर घसरले-वधारले
येस बँकेचे सर्वात अधिक १५.१९ टक्क्यांपर्यंत शेअर वधारले. त्यापाठोपाठ टाटा मोटर्स, इंडसइंड बँक, एसबीआय, बजाज ऑटो, एशियन पेंट्स, अॅक्सिस बँक, टाटा स्टील, मारुतीचे शेअर हे ९.८२ टक्क्यापर्यंत वधारले. एचसीएल टेक, वेदांत, पॉवरग्रीड, कोटक बँक, इन्फोसिस, ओएनजीसी, टेक महिंद्रा, एल अँड टी आणि एचडीएफसी बँकेचे शेअर हे १.०४ टक्क्यापर्यंत घसरले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details