महाराष्ट्र

maharashtra

शेअर बाजाराचा सर्वोच्च विक्रमी उच्चांक; 269 अंशाने वधारून पोहोचला 40,435 वर

By

Published : Nov 4, 2019, 12:20 PM IST

विदेशी गुंतवणूदार संस्थांकडून (एफपीआय) म्युच्युअल फंड आणि शेअरमध्ये गुंतवणूक सातत्याने होत आहे. या कारणाने देशातील शेअर बाजारामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

संग्रहित - शेअर बाजारामधील उत्साह

मुंबई - शेअर बाजाराने सकाळच्या सत्रात 40,435 एवढा विक्रमी निर्देशांक नोंदविला आहे. हा आजपर्यंतचा सर्वोच्च विक्रमी निर्देशांक आहे. विदेशी गुंतवणूकदारांचा निधी आणि जागतिक आर्थिक मंचावरील सकारात्मक स्थिती या कारणांनी निर्देशांक 269 अंशाने वधारला.

निफ्टीच्या निर्देशांकही 75.85 अंशाने वधारून 11,966.45 वर पोहोचला.


या कंपन्यांचे शेअर घसरले-वधारले
वेदांत, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, एसबीआय, एचसीएल टेक, सन फार्म आणि भारती एअरटेलचे शेअर हे 3.20 टक्क्यांनी वधारले आहेत. तर येस बँक, इन्फोसिस, हिरो मोटोकॉर्प, बजाज ऑटो आणि एचयूएलचे शेअर हे 4.80 टक्क्यापर्यंत घसरले.

हेही वाचा-सलग तिसऱ्या महिन्यात जीएसटी १ लाख कोटीहून कमी; ऑक्टोबरमध्ये 'एवढे' झाले संकलन

  • मागील सत्रात शेअर बाजार निर्देशांक 35.98 अंशाने वधारून 40,165.03 वर पोहोचला होता. तर निफ्टीचा निर्देशांक हा 13.15 अंशाने वधारून 11,890.60 वर पोहोचला होता.
  • विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी शुक्रवारी 533.37 कोटींच्या शेअरची भांडवली बाजारात खरेदी केली. तर देशातील गुंतवणूकदार संस्थांनी 136.50 कोटींचे शेअर शुक्रवारी विकले आहेत.
  • विदेशी गुंतवणूदार संस्थांकडून (एफपीआय) म्युच्युअल फंड आणि शेअरमध्ये गुंतवणूक सातत्याने होत आहे. या कारणाने देशातील शेअर बाजारामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details