महाराष्ट्र

maharashtra

सोन्याच्या दरात प्रति तोळा १६९ रुपयांची घसरण; चांदीही स्वस्त

By

Published : Jul 12, 2021, 6:26 PM IST

सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. चांदीच्या दरात प्रति किलो ३०० रुपयांनी घसरण होऊन ६७,६११ रुपये दर आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६७,९११ रुपये होता.

Gold rate
सोने दर

नवी दिल्ली - सोन्याचे दर दिल्लीत प्रति तोळा १६९ रुपयांनी घसरून ४६,७९६ रुपये आहेत. जागतिक बाजारात सोन्याचे दर घसरल्याने देशातही दरात घसरण झाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.

मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ४६,९६५ रुपये होता. सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. चांदीच्या दरात प्रति किलो ३०० रुपयांनी घसरण होऊन ६७,६११ रुपये दर आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६७,९११ रुपये होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरून प्रति औंस १,८०४ डॉलर आहेत. तर चांदीचे दर स्थिर राहून प्रति औंस २६.०१ डॉलर आहेत.

हेही वाचा-VIDEO : 'असा' आहे मलाला युसूफझाईचा जीवनप्रवास!

जागतिक बाजारात संमिश्र स्थिती-

डॉलर इंडेक्समध्ये डॉलरचे घसरलेले मूल्य आणि जागतिक बाजारातील संमिश्र स्थितीमुळे सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपान पटेल यांनी सांगितले.

हेही वाचा-हिमाचल प्रदेश: मुसळधार पावसाने गावातील घरांमध्ये वाहून आला राडारोडा

कोरोनाविरोधातील लसीकरण मोहिमेनंतर सोन्याच्या दरात घसरण सुरू-

गतवर्षी दिवाळीच्या दरम्यान सोन्याचे दर प्रति तोळा ५० हजार रुपयांहून अधिक झाले होते. मात्र, कोरोनाविरोधातील लसीकरण मोहिम आणि कोरोनाची दुसरी लाट ओसरली असताना सोन्याच्या दरात घसरण होत आहे. सोन्यामधील गुंतवणूक ही अत्यंत सुरक्षित मानली जाते. त्यामुळे जोखीमच्या वेळी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याकडे गुंतवणूकदारांचा ओढा असतो.

ABOUT THE AUTHOR

...view details