बंगळुरू- दिवाळीच्या दोनच दिवसात भारतीयांनी चिनी कंपनी असलेल्या शाओमीचे १ कोटी २० लाख उत्पादने खरेदी केले आहेत. यामध्ये टीव्ही व स्मार्टफोन अशा उत्पदानांचा समावेश आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कंपनीने ४० टक्के विक्री वृद्धी अनुभवली आहे.
शाओमी इंडियाच्या ऑनलाईन सेलचे प्रमुख रघु रेड्डी म्हणाले, सण हा नेहमीच शाओमीसाठी विक्रीचा हंगाम राहिलेला आहे. एमआय चाहत्यांनी सण आनंदाने साजरा करावा, यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे.