महाराष्ट्र

maharashtra

शाओमीच्या स्मार्टफोनमध्ये त्रुटी; ग्राहकांच्या वाढत्या तक्रारीनंतर कंपनीकडून दखल

By

Published : Nov 14, 2020, 5:33 PM IST

एमआय आणि रेडमीच्या डिव्हाईसमध्ये त्रुटी दिसत आहेत. त्यामुळे गरज नसतानाही स्मार्टफोन रिबुटिंग होतात. तसेच अ‌ॅप अपडेट होतानाही काही त्रुटी निर्माण होतात. या त्रुटी दूर करण्यासाठी कंपनी अ‌ॅप डेव्हलपरबरोबर काम करत आहे.

शाओमी
शाओमी

नवी दिल्ली - एमआय आणि रेडमीच्या स्मार्टफोनमध्ये बग असल्याचे शाओमी कंपनीने कबूल केले आहे. हे स्मार्टफोन सतत रिबुटिंग होत असल्याच्या ग्राहकांनी तक्रारी केल्या आहेत. या तक्रारीची शाओमी कंपनीने दखल घेतली आहे. शाओमीच्या माहितीनुसार स्मार्टफोनमधील त्रुटी दूर करण्याासाठी टीम काम करत आहे.

एमआय आणि रेडमीच्या डिव्हाईसमध्ये त्रुटी दिसत आहेत. त्यामुळे गरज नसतानाही स्मार्टफोन रिबुटिंग होतात. तसेच अ‌ॅप अपडेट होतानाही काही त्रुटी निर्माण होतात. या त्रुटी दूर करण्यासाठी कंपनी अ‌ॅप डेव्हलपरबरोबर काम करत आहे. त्यामध्ये पुढील आठवड्यापर्यंत कायमस्वरुपी दुरुस्ती करण्यात येणार आहे. गेल्या ३६ तासांपासून तात्पुरत्या सुधारणा केल्याचे कंपनीने म्हटले आहे.

ग्राहकांच्या कंपनीबाबत ट्विटरवर तक्रार-

जेव्हा ग्राहक फोन बंद करून सुरू कतो, तेव्हा बग ( तांत्रिक त्रुटी) दिसून येतो. या बगमुळे सर्व फोनमधील डाटा काढावा लागला. तरीही शाओमी कंपनीकडून प्रतिसाद दिला जात नाही, ही दु:खद गोष्ट असल्याचे एका ग्राहकाने ट्विटमध्ये म्हटले आहे. काही बगमुळे फोन स्वंयचिलतपणे रिबुटिंग होतो. या त्रुटी लवकरात लवकर दूर कराव्या, असे दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले आहे.

शाओमीकडून एमआय वॉच लाँच-

चिनी स्मार्टफोन कंपनी शाओमीने देशात एमआय वॉच दिवाळीत लाँच केले आहे. या वॉचची किंमत १० हजार ९९९ रुपये आहे. दिवाळीनिमित्त हे घड्याळ देशात ९ हजार ९९९ रुपयांना डिसेंबरपर्यंत खरेदी करणे शक्य होणार आहे. ही विक्री अ‌ॅमेझॉनवरून ६ ऑक्टोबरपासून करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details