महाराष्ट्र

maharashtra

अदानी ग्रुपला झटका, 4500 कोटींच्या आयपीओला सेबीकडून तात्पुरती स्थगिती

By

Published : Aug 21, 2021, 5:12 PM IST

गौतम अदानी

अदानी विलमार्स लि. (एडब्ल्यूएल) या कंपनीचा सुमारे 4,500 कोटींचा आयपीओ शेअर बाजारात प्रस्तावित आहे. या कंपनीकडून फोर्च्यून ब्रँडच्या नावाने खाद्यतेलाची विक्री होते.

नवी दिल्ली - अब्जाधीश गौतम अदानी यांची मालकी असलेल्या अदानी विलमार्सच्या प्रस्तावित 4,500 कोटींच्या आयपीओला सेबीने तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे अदानी ग्रुपला मोठा झटका बसला आहे. कोणत्या कारणाने आयपीओला स्थगिती दिली याचे सेबीने स्पष्टीकरण दिले नाही.

अदानी विलमार्स कंपनीने आयपीओसाठी 3 ऑगस्टला सेबीकडे कागदपत्रे सादर केली होती. सेबीच्या वेबसाईटवर 13 ऑगस्टच्या माहितीनुसार अदानी विलमार्सच्या आयपीओला तात्पुरती स्थगिती दिल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित केले आहे.

हेही वाचा-अफगाणिस्तानमध्ये भयंकर परिस्थिती, पाहा फोटोच्या माध्यमातून

अदानी ग्रुपने ही दिली प्रतिक्रिया

सेबीकडून कोणताही औपचारिक संवाद साधण्यात आला नसल्याचे अदानी ग्रुपच्या प्रवक्त्याने सांगितले. अदानी ग्रुपचे प्रवक्ते म्हणाले, की आम्ही सेबीच्या नियमांचे पूर्णपणे पालन करतो. यापूर्वीही सेबीने विचारलेली माहिती आम्ही संपूर्णपणे दिली आहे. आम्ही बाजार नियामकाला सहकार्य करणे सुरुच ठेवू व भविष्यातही सहकार्य करणार आहोत.

हेही वाचा-राकेश अस्थाना हे मोदींचे ब्रम्हास्त्र..मनीष सिसोदिया यांनी पंतप्रधानांवर केला 'हा' गंभीर आरोप

फोर्च्यून ब्रँडच्या नावाने खाद्यतेलाची विक्री

अदानी विलमार्स लि. (एडब्ल्यूएल) या कंपनीचा सुमारे 4,500 कोटींचा आयपीओ शेअर बाजारात प्रस्तावित आहे. या कंपनीकडून फोर्च्यून ब्रँडच्या नावाने खाद्यतेलाची विक्री होते. ही कंपनी खाद्यतेलामधील आघाडीची कंपनी आहे. अदानी विलमार्समध्ये अदानी आणि विलमारची प्रत्येकी 50 टक्के गुंतवणूक आहे.

हेही वाचा-तालिबानी दहशतवाद्यांनी केले १५० भारतीयांचे अपहण, वाचा नेमकं काय घडलं

अदानी ग्रुपच्या चार कंपन्यांची खाती गोठविल्याचे आले होते रिपोर्ट

एनएसडीएलच्या वेबसाइटनुसार, ही अदानी ग्रुपच्या चार कंपन्यांची खाती 31 मे रोजी किंवा त्यापूर्वी गोठविली होती. या कंपनीचा अदानी एंटरप्रायजेसमध्ये 6.82 टक्के, अदानी ट्रान्समिशनमध्ये 8.03 टक्के, अदानी टोटल गॅसमध्ये 5.92 टक्के आणि अदानी ग्रीनमध्ये 3.58 टक्के हिस्सा आहे. कस्टोडियन बँका आणि परदेशी गुंतवणूकदार हाताळणार्‍या कायदा संस्थांच्या म्हणण्यानुसार या विदेशी फंडांमध्ये लाभार्थ्यांची संपूर्ण माहिती नसल्याने त्यांची खाती गोठविली आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये (पीएमएलए) लाभार्थी मालकीची संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे.

अब्जाधीश गौतम अदानी यांनी तिन्ही कंपन्यांचे खाती गोठविल्याचे वृत्त 14 जून 2021 ला फेटाळले होते खाती गोठविल्याचे रिपोर्ट स्पष्टपणे चुकीचे आणि दिशाभूल करणारे असल्याचा दावा केला आहे. एनएसडीएलने अदानी ग्रुपच्या मालकीच्या तीन कंपन्यांची खाती गोठविल्याचे रिपोर्ट आले होते. त्या वृत्तानंतर अदानी ग्रुपच्या शेअरला मोठा फटका बसला होता.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापनाचा ताबा अदानी समुहाकडे येताच विमानतळाचे मुख्यालय मुंबईतून अहमदाबादमध्ये हलविले असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यावर कंपनीने मुख्यालय मुंबईत राहणार असल्याचे स्पष्ट केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details