महाराष्ट्र

maharashtra

ओयोचे ऑनलाईन पोर्टल लाँच; 'या' व्यवसायिकांना होणार फायदा

By

Published : Oct 17, 2019, 7:53 PM IST

व्हल एजंटबरोबर संबंध अधिक वृद्धिगंत करण्यासाटी सुपरएजंट पोर्टल सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले. या पोर्टलमधून सहजरित्या बुकिंगचा अनुभव घेत असल्याचेही ओयो कंपनीने म्हटले आहे.

संग्रहित - ओयो

नवी दिल्ली- हॉस्पिटिलिटी कंपनी असलेल्या ओयोने आज सुपरएजंट हे ऑनलाईन पोर्टल लाँच केले. याचा ट्रॅव्हल एजंटला बुकिंगसाठी फायदा होणार आहे.

सुपरएजंट पोर्टलमधून मान्यताप्राप्त आणि नोंदणीकृत ट्रॅव्हल एजंटला ग्राहकांसाठी बुकिंग करता येणार आहे. सध्या ओयोचे अ‌ॅप, डेस्कटॉप वेबसाईट आणि ऑनलाईन ट्रॅव्हल एजन्सी आहे. यामध्ये आता ट्रॅव्हल एजंटच्या ऑनलाईन पोर्टलची भर पडणार आहे.

देशामध्ये आदरातिथ्य( हॉस्पिटॅलिटी), प्रवास आणि पर्यटनाची बाजारपेठ वेगाने वाढत आहे. या उद्योगात ट्रॅव्हल एजंटचे ग्राहकांसाठीचे महत्त्व वाढत असल्याचे ओयो हॉटेल्स आणि होम्सचे चिफ ऑपरेटिंग ऑफिसर गौरव अजमेरा यांनी सांगितले. ट्रॅव्हल एजंटबरोबर संबंध अधिक वृद्धिगंत करण्यासाटी सुपरएजंट पोर्टल सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले. या पोर्टलमधून सहजरित्या बुकिंगचा अनुभव घेता असल्याचेही ते म्हणाले.

ओयो ही २४ देशातील ८०० शहरामध्ये हॉटेल बुकिंगची सेवा देते. ओयोकडून चीनमध्येही ३२० शहरातील १० हजार नामांकित हॉटलमध्ये ऑनलाईन रुम बुक करण्याची नागरिकांना सुविधा देण्यात येते.

ABOUT THE AUTHOR

...view details