महाराष्ट्र

maharashtra

मारुती सुझुकीची इंडसइंड बँकेबरोबर भागीदारी; ग्राहकांना मिळणार सुलभ कर्ज

By

Published : Jun 16, 2020, 6:37 PM IST

मारुती सुझुकीच्या ग्राहकांना १ लाखाच्या कर्जावर पहिली तीन महिने 899 रुपये मासिक हप्ता द्यावा लागणार आहे. तर दुसऱ्या वाहन कर्ज योजनेत प्रति लाखावर 1 हजार 800  रुपये मासिक हप्ता द्यावा लागणार आहे.

Maruti Suzuki
मारुती सुझुकी

नवी दिल्ली – देशातील सर्वात मोठी चारचाकी उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने ग्राहकांना वाहन कर्ज देण्याकरता इंडसइंड बँकेबरोबर भागीदारी केली आहे. टाळेबंदीचे नियम शिथील केले असताना वाहन विक्री वाढावी, यासाठी कंपनीने प्रयत्न सुरू केले आहेत.

मारुती सुझुकीच्या ग्राहकांना १ लाखाच्या कर्जावर पहिली तीन महिने 899 रुपये मारुती सुझुकी हप्ता द्यावा लागणार आहे. तर दुसऱ्या वाहन कर्ज योजनेत प्रति लाखावर 1 हजार 800 रुपये मासिक हप्ता द्यावा लागणार आहे. ज्यांच्याकडे अधिकृत उत्पन्नाचा पुरावा आहे, अशा व्यक्तींना वाहन खरेदीसाठी 100 टक्क कर्ज देण्यात येणार आहे. तर उत्पन्नाचा पुरावा नसेल तर वाहनाच्या शोरुममधील किमतीप्रमाणे कर्ज देण्यात येणार आहे. ही कर्जाची योजना मारुतीच्या निवडक मॉडेलवर उपलब्ध असणार आहे.

उत्पन्नाचा पुरावा नसतानाही कर्ज दिल्याने ग्रामीण व शहरातील ग्राहकांना सोय होईल, असा विश्वास मारुती सुझुकी कंपनीने व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details