महाराष्ट्र

maharashtra

कोरोनाचा फटका; 17 वर्षात पहिल्यांदाच मारुती सुझुकीला तिमाहीत तोटा

By

Published : Jul 29, 2020, 6:37 PM IST

मारुती सुझुकी ही जुलै 2003 मध्ये शेअर बाजारात सूचिबद्ध झाली आहे. त्यानंतर पहिल्यांदाच कंपनीला तिमाहीत तोटा सहन करावा लागला आहे. मागील आर्थिक वर्षात एप्रिल ते जुनच्या तिमाहीत मारुतीला 1 हजार 376.8 कोटींचा निव्वळ नफा झाला होता.

संग्रहित
संग्रहित

नवी दिल्ली –कोरोनाच्या संकटामुळे देशातील सर्वात मोठ्या चारचाकी उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीला फटका बसला आहे. गेल्या 17 वर्षात पहिल्यांदाच मारुती सुझुकीला तिमाहीत तोटा सहन करावा लागला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 30 जून अखेर मारुतीला 268.3 कोटींचा तोटा झाला आहे.

मारुती सुझुकी ही जुलै 2003 मध्ये शेअर बाजारात सूचिबद्ध झाली आहे. त्यानंतर पहिल्यांदाच कंपनीला तिमाहीत तोटा सहन करावा लागला आहे. मागील आर्थिक वर्षात एप्रिल ते जुनच्या तिमाहीत मारुतीला 1 हजार 376.8 कोटींचा निव्वळ नफा झाला होता.

पहिल्या तिमाहीत चारचाकींच्या विक्रीत घसरण होवून 3 हजार 679 कोटी रुपयांची वाहनांची विक्री झाली आहे. तर गतवर्षी पहिल्या तिमाहीत 18 हजार 738.8 कोटी रुपयांच्या वाहनांची विक्री झाली होती.

पहिल्या तिमाहीत मारुती सुझुकीने एकूण 76 हजार 599 वाहनांची विक्री केली आहे. तर देशात 67 हजार 27 वाहनांची विक्री केली आहे. मारुतीने 9 हजार 572 चारचाकींची निर्यात केली आहे. तर मागील आर्थिक वर्षात कंपनीने 4 लाख 2 हजार 594 वाहनांची विक्री केली होती.

जगभरात कोरोना महामारीचा संसर्ग सुरू असताना कंपनीसाठी पहिली तिमाही ही अभूतपूर्व ठरली आहे. टाळेबंदी असताना पहिल्या तिमाहीत अधिकतर शून्य उत्पादन आणि शून्य वाहनांची विक्री झाल्याचे मारुती सुझुकीने म्हटले आहे. कर्मचाऱ्यांसह पुरवठा साखळीतील कर्मचारी व ग्राहकांच्या आरोग्याला प्राधान्य देत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details