महाराष्ट्र

maharashtra

बांधकाम क्षेत्रात रोजगार निर्मितीसाठी 'क्रेडाई पुणे मेट्रो'तर्फे प्रशिक्षण आणि रोजगार उपक्रमाचे आयोजन

By

Published : May 31, 2020, 6:59 PM IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांवर बेरोजगारीचे संकट ओढावले आहे. या पार्श्वभूमीवर 'क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून देण्याबद्दलच्या 'कुशलता' या एका उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. या प्रकाल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात महाराष्ट्राच्या विविध भागातील १ हजार तरुणांना प्रशिक्षण देण्याची योजना आहे.

'क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे प्रशिक्षण आणि रोजगार उपक्रम
'क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे प्रशिक्षण आणि रोजगार उपक्रम

पुणे - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि संचारबंदी यामुळे बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर 'क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून देण्याबद्दलच्या 'कुशलता' या एका उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सुमारे ५० हजार बेरोजगार तरुणांना योग्य ते प्रशिक्षण देऊन बांधकाम क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती 'क्रेडाई पुणे मेट्रो'चे अध्यक्ष सुहास मर्चंट यांनी दिली.

हा उपक्रम 'कुशल क्रेडाई'च्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या पथदर्शी प्रकाल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात महाराष्ट्राच्या विविध भागातील १ हजार तरुणांना प्रशिक्षण देण्याची योजना आहे. पथदर्शी प्रकल्पांतर्गत पहिले प्रशिक्षण शिबिर पुणे शहरात घेण्यात येईल. त्यानंतर राज्यातील इतर शहरांमध्ये देखील अशा प्रकारची शिबिरे टाळेबंदी उठल्यानंतर घेण्यात यावीत, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

कुशल क्रेडाईच्या माध्यमातून आजवर ३५ हजाराहून अधिक बांधकाम कामगारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. हा अनुभव 'कुशलता' उपक्रम राबविण्यासाठी उपयोगी ठरेल असा विश्वास क्रेडाईला आहे. याआधी इतर क्षेत्रात काम करत असलेल्या कामगारांना बांधकाम क्षेत्रात यायचे असल्यास हे प्रशिक्षण उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे त्याला बांधकाम क्षेत्रात सामावून घेणे सोपे होईल. या प्रशिक्षण शिबिरासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. तसेच प्रशिक्षणार्थींची राहण्याची आणि जेवणाची सोय देखील ठेकेदारांतर्फे करण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details