महाराष्ट्र

maharashtra

औरंगाबाद : कोरोनामुळे 9 महिन्यांच्या मुलीचा मृत्यू, आतापर्यंत चार बालकांनी गमावला जीव

By

Published : May 3, 2021, 9:36 AM IST

9 महिन्यांच्या या मुलीला 28 एप्रिलला घाटीत उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी या बाळाची व आई-वडिलांची कोरोना टेस्ट केली, यात बाळासह आईसुद्धा पॉझिटिव्ह आली.

औरंगाबाद कोरोना अपडेट
Aurangabad corona situation

औरंगाबाद -कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वयोवृद्धांसह तरुणांची मृत्यू संख्या वाढत आहे. त्यातच आता लहान मुलांचा मृत्यू होण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात 9 महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत 4 बाळांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.

बाळाची विकासाची गती होती मंद -

9 महिन्यांच्या या मुलीला 28 एप्रिलला घाटीत उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी या बाळाची व आई-वडिलांची कोरोना टेस्ट केली, यात बाळासह आईसुद्धा पॉझिटिव्ह आली. शिवाय या बाळाला इतर आजार असल्याने, त्याची प्रकृती गंभीरच होती.

जन्मापासूनच बाळाच्या विकासाची गती मंद होती. बाळाचे वजन कमी होते. त्यामुळे ते कुपोषित गटात गणले गेले, अशी माहिती घाटीतील बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रभा खैरे यांनी दिली. वाढणारे मृत्यू पाहता आता वयोवृद्धांसह युवक आणि मुलांची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

आतापर्यंत चार बाळांचा मृत्यू -

यापूर्वी 30 मार्चला 29 दिवसांचा मुलगा आणि सहा महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला होता. तसेच 27 एप्रिलला 1 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू,1 मेला आरेफ कॉलनीतील 9 महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे लहान मुलांनादेखील धोका वाढल्याचे समोर आल्याने पालकांची चिंता वाढली आहे

ABOUT THE AUTHOR

...view details