महाराष्ट्र

maharashtra

राहुल गांधी जाणार युपीच्या दौऱ्यावर; राज्यातील झेडपी निवडणुकीकरिता मतमोजणी: वाचा टॉप न्यूज एका क्लिकवर

By

Published : Oct 6, 2021, 5:56 AM IST

Updated : Oct 6, 2021, 6:39 AM IST

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

राहुल गांधी
राहुल गांधी

आज 'या' बातम्यांवर असेल नजर

  • मुंबईकरांमधील काही प्रभागांमध्ये परळच्या काही भागात ५ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबरदरम्यान ही पाणी पुरवठा पूर्णपणे खंडित करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
  • म्हाडाच्या (Mhada) कोंकण मंडळातर्फे 8 हजार 984 सदनिकांसाठी (Apartment) जाहीर संगणकीय सोडतीचे सुधारित वेळापत्रक (timetable) पुन्हा जाहीर करण्यात आले आहे. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या प्रारुप यादीची प्रसिद्धी https://lottery.mhada.gov.in व https://mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळांवर 6 ऑक्टोबरला सायंकाळी 6 वाजता केली जाणार आहे.
  • राज्यातील नागपूर, वाशीम, अकोला, धुळे, नंदुरबार आणि पालघर या जिल्हा परिषदा; तसेच त्या अंतर्गतच्या स्थगित केलेल्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका पाच ऑक्टोबरला घेण्यात आल्या आहेत. पालघर जिल्हा परिषदेच्या व त्या अंतर्गतच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीही त्याच दिवशी मतदान होईल. या सर्व ठिकाणी ६ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
  • काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे लखीमपूरला जाण्यासाठी लखनौला आज (६ ऑक्टोबर) पोहोचणार असल्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षातील सुत्राच्या माहितीनुसार राहुल गांधी हे चार्टर विमानाने लखनौला येऊ शकतात. मात्र, त्याबाबत दुजोरा मिळालेला नाही. मात्र, सुत्राच्या माहितीनुसार राहुल गांधींनी कार्यक्रम निश्चित केला आहे.
  • नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे (विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) राष्ट्रीय पात्रता चाचणीसाठी प्रवेशपत्र लवकरच जाहीर केले जाणार आहे. उमेदवारांची परीक्षा ६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्यांची प्रवेशपत्र ही (UGC NET Admit Card 2021) अधिकृत वेबसाइट- ugcnet.nta.nic.in वर पुढील एक किंवा दोन दिवसांमध्ये अपलोड केले जाणार आहेत.
  • चांदिवाल आयोगाकडून परमबीर सिंह यांना शेवटची संधी देण्यात आली आहे. यासंदर्भात पुढील सुनावणी आता 6 ऑक्टोबरला होणार आहे. सेवा नियमांचे उल्लंघन आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाअंतर्गत राज्य सरकारने परमबीर सिंह यांची चौकशी सुरू केली आहे. मात्र, अद्यापही या नोटीस संदर्भात त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. तसेच ते नेमके कुठे आहेत? याबाबत राज्य सरकारला कोणतीही माहिती नाही.

कालच्या महत्त्वाच्या बातम्या

  • गांधीनगर -भाजपल्या गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच गांधीनगर महानगरपालिकेत बहुमत मिळाले आहे. भाजपने 44 जागांपैकी 41 जागा जिंकल्या आहेत. तर, काँग्रेसला 2 आणि आम आदमी पक्षाला एका जागेवरच विजय मिळाला. गाधीनगरची निवडणूक ही राज्याचे नवे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर पाटील यांच्यासाठी परीक्षाच समजली जात होती. यात ते दोघेही पास झाले आहेत. सविस्तर वाचा
  • पंढरपूर -राज्यातील सर्व धार्मिकस्थळे 7 ऑक्टोबरपासून भाविकांसाठी खुले करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर मुखदर्शन सुरू होणार आहे. विठ्ठल रुक्मिणीचे दररोज 10 हजार भाविकांना मुखदर्शन मिळणार आहे. यामध्ये 50% ऑनलाइन ऑफलाइन अशा पद्धतीचे दर्शन असल्याची माहिती विठ्ठल मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. सविस्तर वाचा
  • मुंबई - मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डीला क्रूझवर पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीवर एनसीबी म्हणजेच नार्कोटिस कंट्रोल ब्यूरोने धाड टाकून बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आतापर्यंत अकरा जणांना अटक केली आहे. हे प्रकरण आता आतंरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले असून ड्रग्स खरेदीसाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर करण्यात आल्याची माहिती एनसीबीला मिळाली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबईमधील एनसीबीची टीम कमी पडणार असल्याने अनेक राज्यातून एनसीबीचे अधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत. सविस्तर वाचा
  • नवी दिल्ली - लखीमपूर खीरी हिंसा प्रकरणात सर्व विरोधी पक्ष सरकारविरोधात एकवटले आहेत. लखीमपूर जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांना सीतापूर जिल्ह्यातील हरगाव येथे अटक करण्यात आली आहे. यूपी पोलिसांनी प्रियंका गांधींना नजरकैदेत ठेऊन 24 तासांहून अधिक काळ झाला आहे. यावर काँग्रेस केंद्र सरकारविरोधात आक्रमक झाली आहे. सविस्तर वाचा
  • नवी दिल्ली -शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. देशात लोकशाही व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. विरोधकांनी एकत्र येऊन विरोध करण्याची गरज असल्याचे संजय राऊत राहुल गांधी यांच्या भेटीनंतर म्हणाले. सविस्तर वाचा

जाणून घ्या आजचे राशीभविष्य-

Last Updated :Oct 6, 2021, 6:39 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details