ETV Bharat / city

Cruise Drug Case : आता एनसीबीच्या मदतीला अन्य राज्यातील अधिकारी

author img

By

Published : Oct 5, 2021, 4:54 PM IST

Updated : Oct 5, 2021, 5:11 PM IST

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण आता आतंरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. त्यामुळे या प्रकरणात पार्टीचे आयोजक व त्यात सहभागी असलेले लोक संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान अनेक ठिकाणी धाडी टाकल्या जाणार आहेत. त्याची तयारी एनसीबीने केली आहे. त्यासाठी मुंबईमधील एनसीबी अधिकाऱ्यांची संख्या कमी पडत आहे. एनसीबी अधिकाऱ्यांची संख्या कमी पडत असल्याने देशातील इतर एनसीबी कार्यालयातील अधिकारी मुंबईत बोलावण्यात आले आहेत. त्यानुसार गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली येथून एनसीबी अधिकारी मुंबईत आले आहेत.

एनसीबी
एनसीबी

मुंबई - मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डीला क्रूझवर पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीवर एनसीबी म्हणजेच नार्कोटिस कंट्रोल ब्यूरोने धाड टाकून बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आतापर्यंत अकरा जणांना अटक केली आहे. हे प्रकरण आता आतंरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले असून ड्रग्स खरेदीसाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर करण्यात आल्याची माहिती एनसीबीला मिळाली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबईमधील एनसीबीची टीम कमी पडणार असल्याने अनेक राज्यातून एनसीबीचे अधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत.

माहिती देतांना एनसीबी अधिकारी

गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली येथून एनसीबी अधिकारी -

कॉर्डींया द क्रूझमधील पार्टीमध्ये ड्रग्स घेतल्याचे समोर आल्यावर एनसीबीने आतापर्यंत ११ जणांना ताब्यात घेतले आहे. क्रूझवर जे ड्रग्स आणण्यात आले होते. त्यासाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर करण्यात आला आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण आता आतंरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. त्यामुळे या प्रकरणात पार्टीचे आयोजक व त्यात सहभागी असलेले लोक संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान अनेक ठिकाणी धाडी टाकल्या जाणार आहेत. त्याची तयारी एनसीबीने केली आहे. त्यासाठी मुंबईमधील एनसीबी अधिकाऱ्यांची संख्या कमी पडत आहे. एनसीबी अधिकाऱ्यांची संख्या कमी पडत असल्याने देशातील इतर एनसीबी कार्यालयातील अधिकारी मुंबईत बोलावण्यात आले आहेत. त्यानुसार गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली येथून एनसीबी अधिकारी मुंबईत आले आहेत.

११ जण ताब्यात -

मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या कॉर्डींया द क्रूझवर हायप्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने शनिवारी रात्रीच्या सुमारास कारवाई करत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले होते. या कारवाईत तीन महिलांसह एकूण ११ जणांना ताब्यात घेण्यात आले असून यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश होता. त्यानंतर, रविवारी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाझ सेठ मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना काल किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यांना न्यायालयाने ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. मात्र, या प्रकरणात एनसीबीने पुन्हा काल कॉर्डींया द क्रूझवर धाड टाकली होती. क्रूझवरून एनसीबीने ताब्यात घेतलेल्या ८ जणांपैकी चौकशी केल्यानंतर एनसीबीने तीन आरोपींना अटक केली आहे. काल केलेल्या कारवाईत आणखी काही जण क्रूझवर ड्रग्स घेत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे एनसीबीने कॉर्डींया द क्रूझचे सीईओ जुर्गन बेलोम यांना पुन्हा समन्स बजावत चौकशीसाठी बोलावले आहे. या चौकशीत आणखी नवीन खुलासे होण्याची शक्यता आहे.

पार्टीचा संपूर्ण तपशील एनसीबीने मागितला -

मिळालेल्या माहितीनुसार, कॉर्डिया द क्रूझवर संबंधित अधिकाऱ्यांकडून ज्या दिवशी धाड टाकली. त्या दिवशीचा जहाजाचा मेनिफेस्टो मागविला आहे. यातून जहाजावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा संपूर्ण तपशील, रूम नंबर, त्यांच्या आय-कार्डचा तपशील, मोबाइल क्रमांकासह इतरही माहिती उपलब्ध होईल. जहाजाचे सर्व सीसीटीव्ही फुटेजही जहाजाच्या अधिकाऱ्यांकडून मागविण्यात आले आहेत. याशिवाय या क्रूझवर ड्रग्ज डीलर असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे कॉर्डींया द क्रूझवर २ ऑक्टोबर झालेल्या पार्टीचा संपूर्ण तपशील एनसीबीने मागितला आहे. श्रेयस नायर मुंबईतल्या गोरेगाव परिसरात राहतो. रेव पार्टीत वेग-वेगळे ग्रुप पार्टी करत होते. त्यातील एका ग्रुपला श्रेयसने ड्रग्स पुरवले होते. श्रेयसही या पार्टीत जाणार होता. पण काही कारणाने तो पार्टीत पोहचू शकला नाही. पार्टी आयोजन करणाऱ्यांपैकी एक श्रेयस आहे. याशिवाय श्रेयस, आर्यन खान आणि अरबाझचा मित्रसुद्धा आहे.

हेही वाचा - Cruise Drug Case : 'कॉर्डींया द क्रूझ'चा सीईओ जुर्गन बेलोमला एनसीबीने बजावला दुसऱ्यांदा समन्स!

Last Updated :Oct 5, 2021, 5:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.