ETV Bharat / bharat

lakhimpur Violence : संजय राऊत यांनी घेतली राहुल गांधींची भेट, म्हणाले विरोधकांनी एकत्र येण्याची गरज

author img

By

Published : Oct 5, 2021, 5:06 PM IST

Updated : Oct 5, 2021, 5:55 PM IST

शिवसेनेचे खासदार संजय राऊत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भेटीसाठी गेले आहेत. संजय राऊत यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली.

sanjay raut
sanjay raut

नवी दिल्ली - शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. देशात लोकशाही व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. विरोधकांनी एकत्र येऊन विरोध करण्याची गरज असल्याचे संजय राऊत राहुल गांधी यांच्या भेटीनंतर म्हणाले.

संजय राऊत पत्रकारांशी बोलताना

राहुल गांधींची भेट घेण्यासाठी जाण्यापूर्वी संजय राऊत यांनी माध्यमांना सांगितले की, प्रियंका गांधींना यूपी पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे याबाबत राहुल गांधींची भेट घेणे आवश्यक आहे. जर देशात कायदा सर्वांना समान आहे तर शेतकऱ्यांना चिरडणारा नेता खुलेआम फिरतोय आणि प्रियंका गांधी यांना अटक का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

  • Shiv Sena leader Sanjay Raut met Congress leader Rahul Gandhi in Delhi

    Before meeting he said, "Priyanka Gandhi is arrested so it's necessary to meet Rahul Gandhi. If the law is equal for everyone then why Priyanka Gandhi is in jail & the minister is roaming free." pic.twitter.com/18jxFAGMEc

    — ANI (@ANI) October 5, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

“लखीमपूर खेरी येथे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसोबत झालेल्या हिंसाचाराचाच्या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. त्यातच, उत्तर प्रदेश सरकारने प्रियांका गांधींना 28 तास नजरकैदेत ठेऊन आज अटक केली आहे. अशावेळी एकजुटीने काम करण्याची आवश्यकता असून मी आज याबाबत राहुल गांधी यांची भेट घेईन”, असं ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. संध्याकाळी ४.१५ वाजता राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यात भेट होणार आहे. लखीमपूर हिंसाचार प्रकरणाने राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघत आहे. या प्रकरणानंतर भाजप सरकारविरोधक सर्वपक्षीय विरोधक एकवटले आहेत.

  • #LakhimpurKheriViolence has shaken the nation,@priyankagandhi has been arrested UP govt, opposition leaders are being restricted from meeting farmers. There is need for joint opposition action against oppression by Government in UP. Meeting @RahulGandhi at 4.15 pm today
    जय हिंद!

    — Sanjay Raut (@rautsanjay61) October 5, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हे ही वाचा - Lakhimpur Kheri Violence : जमावबंदी आदेशाच्या उल्लंघन प्रकरणी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना यूपी पोलिसांकडून अटक

Last Updated :Oct 5, 2021, 5:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.