महाराष्ट्र

maharashtra

'या' राशीच्या व्यक्तींना परदेशी जाण्याची संधी लाभेल; वाचा राशीभविष्य

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 12, 2024, 1:21 AM IST

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 12 जानेवारी 2024 च्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

Today Horoscope
राशीभविष्य

मेष : 12 जानेवारी 2024 शुक्रवारी चंद्र मकर राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी असेल. आज आपण आपल्या कौटुंबिक गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल. कुटुंबीयांची एकत्रितपणे बैठक घेऊन एखाद्या महत्वाच्या विषयावर चर्चा कराल. घराचा कायापलट करण्याच्या दृष्टीने काही नवीन मांडणी - सजावट ह्याचा सुद्धा विचार कराल. कामात समाधान लाभेल. स्त्रीयांकडून एखादा सन्मान होईल. आईशी सुसंवाद साधू शकाल. निरूत्साहीपणा सोडून द्यावा लागेल.

वृषभ : 12 जानेवारी 2024 शुक्रवारी चंद्र मकर राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज नवीन काम करण्याची प्रेरणा मिळून त्याची आपण सुरुवात सुद्धा करु शकाल. एखादया रमणीय स्थळाला भेट देऊन आपले मन प्रसन्न होईल. दूरचे प्रवास संभवतात. दूरवरच्या मित्रांच्या शुभ बातम्या समजतील. परदेशी जाण्याची संधी लाभेल. व्यापारात आर्थिक लाभ संभवतो. आरोग्य मध्यम राहील.

मिथुन :12 जानेवारी 2024 शुक्रवारी चंद्र मकर राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा असल्याने प्रत्येक बाबतीत सावध राहावे लागेल. आज नवीन कामाची सुरुवात न करणे हितावह राहील. क्रोधामुळे काही अनिष्ट होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. आजारपणात नवीन उपचारास सुरवात न केल्यास उत्तम. आज खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. घरात किंवा कार्यालयात वाणीवर ताबा ठेवा. वाद टाळा. काही कारणाने खाण्या - पिण्याची आबाळ होऊ शकते. मनास शांतता लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल.

कर्क :12 जानेवारी 2024 शुक्रवारी चंद्र मकर राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा पूर्ण दिवस आनंद, उत्साह व मनोरंजनात जाईल. भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास लाभेल. आनंदाची साधने, वस्त्रे इ. खरेदी होईल. प्रणयक्रिडेत यशस्वी व्हाल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. वाहन सौख्य लाभेल. प्रतिष्ठेस तडा जाऊ शकतो. व्यावसायिक क्षेत्रात लाभ संभवतात. प्रकृती उत्तम राहील.

सिंह : 12 जानेवारी 2024 शुक्रवारी चंद्र मकर राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. घरात शांतता नांदेल. नोकरीच्या ठिकाणी सहकार्‍यांचे अपेक्षित सहकार्य मिळविण्यात अडचणी येतील. दैनिक कामात अडथळे येतील. शत्रू व प्रतिस्पर्ध्यांमुळे त्रास होईल. वरिष्ठांशी वाद संभवतात. स्त्रियांना माहेरहून एखादी अप्रिय बातमी मिळण्याची शक्यता आहे. आज उदासीनता व साशंकता अधिक प्रमाणात राहिल्याने मन उदास होईल. प्रकृती साधारण राहील. प्रयत्नांच्या मानाने यश कमीच मिळेल.

कन्या :12 जानेवारी 2024 शुक्रवारी चंद्र मकर राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी असेल. आज संतती विषयक काही चिंता निर्माण होतील. मन विचलीत होईल. पोटाच्या तक्रारीमुळे यातना होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येतील. अचानक खर्च उदभवतील. बोलताना बौद्धीक चर्चे पासून दूर राहणे हितावह राहील. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. शेअर्स, लॉटरीत नुकसान संभवते.

तूळ : 12 जानेवारी 2024 शुक्रवारी चंद्र मकर राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी असेल. आज मानसिक थकवा जाणवेल. आपण जास्त हळवे व्हाल. मनात उठणार्‍या विचार तरंगांमुळे त्रास होईल. आई व स्त्री विषयक चिंता सतावेल. आजचा दिवस प्रवासासाठी प्रतिकूल आहे. पाण्या पासून दूर राहणे हितावह राहील. झोप पूर्ण न झाल्याने मानसिक ताण येईल. कौटुंबिक तसेच जमीन - जुमल्याच्या बाबतीत सावध राहावे लागेल.

वृश्चिक : 12 जानेवारी, 2024 शुक्रवारी चंद्र मकर राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी असेल. आज दिवसभर आपण आनंदित राहू शकाल. नवीन कार्याचा आरंभ करू शकाल. सहकार्‍यांकडून सौख्य व आनंद मिळेल. मित्र व नातलगांची भेट होईल. कोणत्याही कामात आज यश मिळेल. आर्थिक फायदा होईल. नशिबाची साथ मिळेल. भावंडांकडून लाभ होतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. स्नेह संबंध जुळतील. छोटे प्रवास होतील.

धनू :12 जानेवारी 2024 शुक्रवारी चंद्र मकर राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. काही गैरसमजामुळे निर्णयाप्रत जाणे अवघड होईल. मन दुःखी राहील. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. कामात अपेक्षित यश न मिळाल्याने मन निराश होईल. कामाचा व्याप वाढेल. अकारण खर्च वाढतील.

मकर : 12 जानेवारी 2024 शुक्रवारी चंद्र मकर राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपले प्रत्येक काम सहजपणे पार पडेल. नोकरी - व्यवसायात आपली प्रतिष्ठा वाढेल. पदोन्नती संभवते. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. शारीरिक दुखापतीची शक्यता असल्याने सांभाळून राहा. मित्र परिवार व स्नेहीजनांचा सहवास घडल्याने मानसिक शांती लाभेल.

कुंभ :12 जानेवारी 2024 शुक्रवारी चंद्र मकर राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी असेल. आर्थिक व्यवहार तसेच जमीन - जुमल्यांच्या व्यवहारात आज कोणाला जामीन न राहणे हितावह राहील. मानसिक एकाग्रता राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करावी. आपल्या निर्णयाशी कुटुंबीय सहमत होणार नाहीत. इतरांच्या बाबींत हस्तक्षेप केल्यास काही नुकसान संभवते. संभ्रमावस्था व अचानक संकट ह्यांचा सामना करावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

मीन : 12 जानेवारी 2024 शुक्रवारी चंद्र मकर राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी असेल. आज मित्रां कडून आपणाला लाभ होईल व त्यांच्यासाठी खर्च सुद्धा करावा लागेल. सामाजिक कार्यात गोडी वाटेल. मित्र व वडीलधार्‍यांशी संपर्क साधू शकाल. एखाद्या रम्य स्थळी सहलीचे नियोजन कराल. नवे स्नेह - संबंध जुळतील व भविष्यात त्याच्यांकडून लाभ होईल. घरातून चांगली बातमी मिळेल. संतती कडून लाभ होईल. अचानक धनलाभ संभवतो.

हेही वाचा :

  1. सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, शुभ मुहूर्त, राहुकाल तिथी, वाचा आजचे पंचांग
  2. 'या' राशीच्या व्यक्तींना कामा निमित्त बाहेर जावे लागेल; वाचा राशीभविष्य

ABOUT THE AUTHOR

...view details