महाराष्ट्र

maharashtra

हरिद्वारवरुन गंगास्नान करुन परतताना अपघात, 10 यात्रेकरूंचा मृत्यू

By

Published : Jun 23, 2022, 9:33 AM IST

Updated : Jun 23, 2022, 10:14 AM IST

उत्तर प्रदेशात पीलीभीतमध्ये भीषण रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 7 जण जखमी आहेत. त्यातील 2 जणांची परिस्थिती गंभीर आहे.

हरिद्वारवरुन गंगास्नान करुन परतताना अपघात, 10 यात्रेकरूंचा मृत्यू झाला
हरिद्वारवरुन गंगास्नान करुन परतताना अपघात, 10 यात्रेकरूंचा मृत्यू झाला

पिलीभीत: उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यात भीषण रस्ता अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 7 जण जखमी झालेत. राष्ट्रीय महामार्ग 730 वर गुरुवारी सकाळी भीषण अपघात झाला. जिथे पिकअपचे नियंत्रण सुटले आणि झाडावर ती आदळली. ज्यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला. तर 7 जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील 2 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

हरिद्वारवरुन गंगास्नान करुन परतताना अपघात, 10 यात्रेकरूंचा मृत्यू झाला


ही घटना गजरौला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालामूर मध्ये घडली आहे. हरिद्वारहून स्नान करून परतणाऱ्या १७ भाविकांनी भरलेली पिकअप अनियंत्रित होऊन झाडावर आदळली. ज्यामध्ये 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी 9 जण जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्व जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जेथे अन्य दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 7 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्याचवेळी जिल्हा रुग्णालयातून प्राथमिक उपचारानंतर 2 जणांना उपचारासाठी वरिष्ठ केंद्रात पाठवण्यात आले.

डीएम-एसपी घटनास्थळी पोहोचले - अपघाताची माहिती मिळताच पीलीभीतचे जिल्हा दंडाधिकारी पुलकित खरे आणि पोलिस अधीक्षक दिनेश पी हे मोठ्या पोलिस फौजफाट्यासह जिल्हा रुग्णालयात पोहोचले. जेथे प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

हेही वाचा - Mobile Game Side Effect : आईने ऑनलाईन गेम खेळण्यास दिला नकार; नाराज होऊन मुलाने सोडले घर, जाणून घ्या पुढे काय झाले

Last Updated : Jun 23, 2022, 10:14 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details