महाराष्ट्र

maharashtra

SC On Krishna Janmabhoomi : श्रीकृष्ण जन्मभूमी परिसरातील ईदगाहचं वैज्ञानिक सर्वेक्षण, सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली याचिका

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 23, 2023, 12:45 PM IST

SC On Krishna Janmabhoomi : श्रीकृष्ण जन्मभूमी परिसरात असलेल्या ईदगाहचं वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची मागणी श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टनं सर्वोच्च न्यायालयात केली होती. मात्र उच्च न्यायालयात याबाबतचे प्रकरणं प्रलंबित आहेत. त्यामुळे अगोदर अलाहाबाद उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.

SC On Krishna Janmabhoomi
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली SC On Krishna Janmabhoomi : मथुरेतील कृष्ण जन्मभूमी परिसरात असलेल्या ईदगाह परिसराचं वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची मागणी श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टनं केली होती. याप्रकरणी श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टनं सर्वोच्च न्यायालयाता याचिका दाखल केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. विशेष म्हणजे श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टनं अलाहाबाद उच्च न्यायालयानं याचिका फेटाळून लावल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठानं ही याचिका शुक्रवारी फेटाळून लावली आहे.

श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टच्या याचिकेवर काय म्हणालं खंडपीठ : श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टनं दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यामुळे श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टला हा मोठा धक्का मानला जात आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांनी याप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयानं आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित असलेल्या नागरी संहितेच्या आदेश 26 नियम 11 अंतर्गत अर्जावर अद्याप निर्णय झाला नाही. तो निर्णय येणं अद्याप बाकी असल्याचं खंडपीठानं स्पष्ट केलं.

अलाहाबाद उच्च न्यायालय घेईल निर्णय :ट्रायल न्यायालयाला आदेश देण्याचे अधिकार नव्हते, असं म्हणता येणार नाही. उच्च न्यायालयानं सुधारित अधिकार क्षेत्र वापरायला हवं होतं, असा आग्रहही करता येणार नसल्याचं खंडपीठानं स्पष्ट करत ही याचिका फेटाळली आहे. एकाच न्यायाधीशाच्या अंतरिम आदेशाविरुद्ध तुम्ही इथं का धाव घेतली ? असा सवालही यावेळी खंडपीठानं याचिकाकर्त्याला केला आहे. त्यामुळे अगोदर उच्च न्यायालयात याबाबतची प्रकरणं प्रलंबित आहेत. त्यामुळे अगोदर अलाहाबाद उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठानं यावेळी दिले.

शाही इदगाह परिसराच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाची मागणी :श्रीकृष्ण जन्मभूमी परिसरातील जागेचा वाद सध्या जोरात सुरू आहे. श्रीकृष्ण जन्मभूमी परिसरातील ईदगाहचं वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची मागणी श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टनं अलाहाबाद उच्च न्यायालयात केली होती. मात्र अलाहाबाद उच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

हेही वाचा :

  1. CJI News : सरन्यायाधीशांनी वकीलाला सुनावलं?, वाचा सविस्तर
  2. JMM Bribe Case : खासदार लाचखोरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालय 1998 च्या निकालावर पुनर्विचार करणार

ABOUT THE AUTHOR

...view details