ETV Bharat / bharat

CJI News : सरन्यायाधीशांनी वकीलाला सुनावलं?, वाचा सविस्तर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 15, 2023, 11:08 PM IST

भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी मैथ्यूज जे. नेदुम्पारा वकिलाला आज चांगलंच झापलंय. मैथ्यूज जे. नेदुम्पारा यांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना ईमेल केला होता. सर्वोच्च न्यायालयानं घटनापीठाच्या प्रकरणांपेक्षा गैर-संविधान खंडपीठाच्या खटल्यांच्या सुनावणीला प्राधान्य दिलं पाहिजे, असं त्यांन म्हटलं होतं.

CJI Thanks Petitioner
CJI Thanks Petitioner

नवी दिल्ली : अनेकदा सर्वोच्च न्यायालयात विविध प्रकरणांची सुनावणी सुरू असताना काही घटना अशा घडतात ज्यांची देशभर चर्चा होते. अशीच घटना आज घडलीय. देशाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड वकिलावर चांगलेच बरसलेय. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सरन्यायाधीशांनी वकिलाला घटनापीठाचं महत्त्व आणि त्यांच्यासमोरील खटले समजावून सांगितले. मैथ्यूज जे. नेदुम्पारा वकिलानं सरन्यायाधीश चंद्रचूड यांना ईमेल केला होता. त्यात त्यांनी घटनात्मक न्यायालयासमोरील खटल्यांमध्ये वेळ वाया जात असल्याने सर्वसामान्यांची प्रकरणे प्रलंबित असल्याचं नमूद केलं होतं. त्यावरुन चंद्रचूड यांनी वकिलाला झापले.

चंद्रचूडांना का आला राग? : शु्क्रवारी एका सुनावणीच्या दरम्यान वकील मैथ्यू नेदुम्परा यांच्या ईमेलवर चंद्रचूड यांनी प्रश्न उपस्थित केले. मैथ्यू यांनी सुप्रीम कोर्टाचे जनरल यांना एक ई मेल पाठवला आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की घटना पीठाने त्यांच्याकडे असलेले खटले आणि प्रकरणं ऐकत बसायला नको. कारण त्यात वेळ वाया जातो आहे. त्यामुळे सामान्य माणसांच्या प्रकरणांची सुनावणी होत नाही. त्यावर चंद्रचूड म्हणाले की यावर मला वाटतं की बहुदा मॅथ्यू हे घटनापीठाकडे काय प्रकरणं आहेत याबाबत अनभिज्ञ आहेत.

"मला तुम्हाला एवढेच सांगायचं आहे, की घटनापीठाची प्रकरणं काय आहेत हे तुम्हाला माहीत नाही असं दिसतं. घटनापीठाची प्रकरणं काय आहेत याबद्दल तुम्हाला माहिती नाहीय. - धनंजय चंद्रचूड, भारताचे सर न्यायाधीश

घटनापीठाचं महत्त्व सांगितलं : त्यानंतर त्यांनी घटनापीठाच्या खटल्यांचे विकलाला महत्त्व सांगितलं. त्यांनी यावर भर दिला की या प्रकरणांमध्ये अनेकदा संविधानाचा अर्थ लावला जातो, जो भारतातील कायदेशीर चौकटीचा पाया बनवतो. एलएमव्ही परवान्याशी संबंधित प्रकरण घटनापीठासमोर आले. त्याचा थेट परिणाम हजारो वाहनचालकांवर होणार आहे. घटनात्मक न्यायालय सामान्य लोकांच्या जीवनावर परिणाम करणारी प्रकरणे हाताळत नाही. कलम 370 बाबत घटनापीठानं देशातील जनतेचे म्हणणे ऐकून घेतलं होतं. चंद्रचूड यांनी असंही म्हटले आहे, की आम्ही कलम 370 बाबत समर्थन, विरोध दोन्ही ऐकलंय, असं घटनापीठाचे महत्त्व वकील मॅथ्यू यांना समजावून सांगितलं.

LMV लायसन्स संदर्भात प्रकरण : घटनापीठाकडे LMV लायसन्स संदर्भात एक प्रकरण आलं होतं. त्याचा परिणाम थेट हजारो चालकांवर होणारा आहे. घटनापीठाकडे अशी प्रकरणं नसतात ज्याचा परिणाम सामान्य माणसांच्या आयुष्यावर होणार नाही. अनुच्छेद ३७० बाबत घटनापीठाने देशाच्या लोकांचं म्हणणं ऐकलं होतं. अनुच्छेद 370 बाबत आम्ही पाठिंबा देणारं म्हणणं आणि विरोधातलं म्हणणं असं दोन्ही ऐकलं होतं असंही चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. असं म्हणत घटनापीठाचं महत्व वकील मॅथ्यू यांना समजावलं.

हेही वाचा -

  1. SC on virtual hearing : व्हर्च्युअल सुनावणी का होत नाही? मुंबईसह देशभरातील उच्च न्यायालयांना 'सर्वोच्च' विचारणा
  2. Supreme Court Hearing On Shiv Sena : शिवसेनेचं चिन्ह, पक्षाबाबत सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी
  3. Declining Democratic Values : लोकशाही मूल्यांवर संसदेच्या विशेष अधिवेशनात चर्चा होणार का? वाचा विशेष लेख
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.