महाराष्ट्र

maharashtra

SBI Recruitment 2023 : 'स्टेट बँक ऑफ इंडिया'मध्ये ६ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, वाचा तपशील

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 1, 2023, 11:59 AM IST

Updated : Sep 1, 2023, 12:22 PM IST

SBI Recruitment 2023 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ६ हजारांहून अधिक पदांसाठी भरती होणार आहे. १ सप्टेंबरपासून भरती परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. जाणून घ्या, याबद्दल सर्वकाही..

SBI
स्टेट बँक ऑफ इंडिया

मुंबईSBI Recruitment 2023: 'स्टेट बँक ऑफ इंडिया'मध्ये बंपर भरती होणार आहे. बॅंकेनं हजारो पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. उमेदवार यासाठी एसबीआयच्या अधिकृत साइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. १ सप्टेंबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार २१ सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतील.

या श्रेणीतील उमेदवारांना परीक्षा शुल्क भरण्यापासून सूट : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ६१६० पदं भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेची पदवी असणं आवश्यक आहे. अधिसूचनेनुसार, अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय २० ते २८ वर्षादरम्यान असावं. या परिक्षेचा अर्ज भरण्यासाठी उमेदवाराला अर्ज शुल्क भरावं लागेल. अर्ज करण्यासाठी जनरल, ओबीसी आणि इडब्लूएस श्रेणीतील उमेदवारांना ३०० रुपये शुल्क भरावं लागेल. तर एससी, एसटी आणि पीडब्लूबीडी श्रेणीतील उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. अधिक संबंधित तपशीलांसाठी उमेदवार एसबीआयच्या अधिकृत साइटला भेट देऊ शकतात.

चाचणी परीक्षा कशी असेल : निवड प्रक्रियेत ऑनलाइन लेखी परीक्षा आणि स्थानिक भाषेची चाचणी असेल. लेखी परीक्षेत जास्तीत जास्त १०० गुणांचे १०० प्रश्न असतील. परीक्षेचा कालावधी ६० मिनिटांचा असणार आहे. या लेखी परीक्षेसाठी, सामान्य इंग्रजीची चाचणी वगळता इतर १३ प्रादेशिक भाषांमध्ये प्रश्न सेट केले जातील. ही परीक्षा इंग्रजी आणि हिंदी भाषेव्यतिरिक्त, आसामी, बंगाली, कन्नड, गुजराती, कोकणी, मणिपुरी, मल्याळम, मराठी, पंजाबी, उडिया, तेलगू, तमिळ आणि उर्दू या प्रादेशिक भाषांमध्येही घेतली जाईल.

परीक्षेसाठीच्या महत्वाच्या तारखा : या परीक्षेसाठी १ सप्टेंबर २०२३ पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०२३ आहे. लेखी परीक्षा, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर २०२३ मध्ये होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

  1. ISRO Exam Cheating : इस्रोच्या भरती परीक्षेत हायटेक कॉपी करणाऱ्या तिघांना अटक, 'असे' फुटले बिंग
  2. SSC HSC Exam : विद्यार्थ्यांनो! रील सोडा अभ्यासाला लागा; वर्षातून दोनदा द्यावी लागणार बोर्डाची परीक्षा
  3. Commercial LPG Prices : व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती झाल्या स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Last Updated : Sep 1, 2023, 12:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details