महाराष्ट्र

maharashtra

Omicron Variant : महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांसाठी RTPCR चाचणी आवश्यक; कर्नाटक सरकारचा निर्णय

By

Published : Nov 28, 2021, 12:01 AM IST

केरळ आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व प्रवाशांचा आरटी-पीसीआर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच केरळ आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात हाय अलर्ट देखील घोषित करण्यात आला आहे.

Omicron Variant
Omicron Variant

बेंगळुरू -दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा ओम्निक्रोंन हा नवा वेरियंट सापडला आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने आज नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहे. आजच्या या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. यामध्ये केरळ आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व प्रवाशांचा आरटी-पीसीआर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच केरळ आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात हाय अलर्ट देखील घोषित करण्यात आला आहे.

प्रमुख निर्णय -

  • केरळ आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व प्रवाशांचा आरटी-पीसीआर अहवाल निगेटिव्ह असणे आवश्यक
  • केरळ आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात हाय अलर्ट
  • केरळहून १६ दिवसांपूर्वी आलेल्या प्रवाशांनी पुन्हा RTPCR चाचणी करावी
  • हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, सार्वजनिक वाचनालय, प्राणीसंग्रहालय आणि इतर सार्वजनिक उद्यान कामगारांना लसीचा दुहेरी डोस घेणे आवश्यक
  • सरकारी कार्यालये आणि मॉल्समध्ये काम करणाऱ्यांनी लसीचे दोन डोस घेणे आवश्यक
  • कॉलेज आणि शाळांचे सांस्कृतिक कार्यक्रम पुढे ढकलण्याचे निर्देश
  • कॉलेजचे सेमिनार आणि इतर कार्यक्रम रद्द
  • लग्नाच्या कार्यक्रमात प्रत्येकाने मास्क लावावा

हेही वाचा -Corona Update : राज्यात शनिवारी 889 नवे कोरोनाबाधित तर 738 रुग्ण कोरोनामुक्त, 17 जणांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details