महाराष्ट्र

maharashtra

Charanjit Singh Channi Lost Election : पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग यांना दोन्ही जागांवर मतदारांनी नाकारले, जाणून घ्या, त्याची कारकीर्द

By

Published : Mar 10, 2022, 5:16 PM IST

काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग यांनी तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याविरोधात हायकंमाडने तक्रार केल्यानंतर चन्नी यांची मुख्यमंत्री पदावर निवड झाली होती. ते चमकौर साहिब आणि भदौडमधून पराभूत ( Channi trail ) झाले आहेत. निवडणूक निकालानंतर त्यांनी नम्रपणे निकाल स्वीकारल्याचे ( Charanjit Singh Channi reaction on results ) म्हटले आहे.

चरणजीत सिंग चन्नी
चरणजीत सिंग चन्नी

नवी दिल्ली- कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर पंजाबच्या मुख्यमंत्री पदावर आमदार चरणजीतसिंग चन्नी यांची वर्णी ( Charanjit Singh Channi lost both his seats ) लागली होती. कॅबिनेट मंत्री और तीन वेळा आमदार असलेले चन्नी हे पंजाबमध्ये पहिले मागासवर्गीय मंत्री होते. मात्र, त्यांना चमकौर साहिब व भदौड या दोन्ही जागांवर पराभव स्वीकारावा लागला आहे.

काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग यांनी तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याविरोधात हायकंमाडने तक्रार केल्यानंतर चन्नी यांची मुख्यमंत्री पदावर निवड झाली होती. ते चमकौर साहिब आणि भदौडमधून पराभूत ( Channi trail ) झाले आहेत. निवडणूक निकालानंतर त्यांनी नम्रपणे निकाल स्वीकारल्याचे ( Charanjit Singh Channi reaction on results ) म्हटले आहे.

पंजाबमधील पहिलेच दलित मुख्यमंत्री

काँग्रेसमधील प्रदीर्घ संघर्ष आणि अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर ज्येष्ठ दलित नेते चरणजीत सिंह चन्नी यांची रविवारी पंजाबमधील पक्षाच्या विधिमंडळ पक्षाचे नवे नेते म्हणून निवड झाली. 58 वर्षीय चन्नी हे राज्याचे मुख्यमंत्री बनणारे पंजाबमधील पहिले दलित नेते आहेत.

हेही वाचा-Punjab Election 2022 Result : पंजाबमधील जनतेने प्रस्थापित नेत्यांना नाकारले, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्यासह प्रकाश सिंग बादल पराभूत

2007 पासून प्रत्येक विधानसभा निवडणूक जिंकले

चन्नी दलित शीख (रामदासिया शीख) समाजातून येतात. ते अमरिंदर सरकारमध्ये तंत्रशिक्षण मंत्री होते. ते रूपनगर जिल्ह्यातील चमकौर साहिब विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. 2007 मध्ये ते प्रथमच या प्रदेशातून आमदार झाले. त्यानंतर ते सलग निवडणूक जिंकत आले आहेत. शिरोमणी अकाली दल-भाजप युती सरकारच्या काळात ते 2015-16 मध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते.

चरणजीत सिंग चन्नी

हेही वाचा-UP Election 2022 First Result : उत्तरप्रदेशचा पहिला निकाल जाहीर; हरगाव विधानसभेचे भाजप उमेदवार सुरेश राही विजयी

पंजाबचे राजकारण दलित नेत्याला समोर ठेवून चन्नी यांची निवड

विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी चन्नी यांना मुख्यमंत्री बनवून काँग्रेस एक सामाजिक समीकरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. राज्यात दलितांची लोकसंख्या 30 टक्क्यांहून अधिक आहे. काँग्रेसची ही खेळी या अर्थाने महत्त्वपूर्ण आहे, की भाजपने पूर्वी सांगितले होते की पंजाबमध्ये सरकार स्थापन झाल्यास दलिताला मुख्यमंत्री बनवले जाईल. बसपाशी युती असलेल्या शिरोमणी अकाली दलाने दलित उपमुख्यमंत्री करण्याचे आश्वासन दिले आहे. आम आदमी पार्टी देखील दलित समाजाला आकर्षित करण्याचा सतत प्रयत्न दिसून आला होता.

हेही वाचा-Punjab Election 2022 Result : पंजाबमधील जनतेने प्रस्थापित नेत्यांना नाकारले, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्यासह प्रकाश सिंग बादल पराभूत

ABOUT THE AUTHOR

...view details