महाराष्ट्र

maharashtra

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विश्व भारती विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्यात होणार सहभागी

By

Published : Dec 24, 2020, 8:50 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (गुरुवार) पश्चिम बंगालमधील विश्व भारती केंद्रीय विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार आहेत. १९२१ मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी या विद्यापीठाची स्थापना केली होती.

PM Narendra Modi t
पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालमधील शांतिनिकेतन येथील विश्व भारती विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहाणार आहेत.

पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड आणि केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक हे देखील या शताब्दी सोहळ्याला उपस्थित राहाणार आहेत. पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक आहे.

रवींद्रनाथ टागोर यांनी १९२१ मध्ये विश्व भारतीची स्थापना केली, हे देशातील सर्वात जुने विद्यापीठ मानले जाते. टागोरांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. बंगाल आणि देशातील महान व्यक्तीमत्वांमध्ये टागोरांचा समावेश होतो. विश्व भारती विद्यापीठाला १९५१ मध्ये केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आणि देशातील महत्त्वाच्या राष्ट्रीय संस्थांमध्ये या विद्यापीठाची गणना होते.

ABOUT THE AUTHOR

...view details