महाराष्ट्र

maharashtra

Celebration At Panipat : नीरजच्या यशानंतर गावात जल्लोष, आई म्हणाली चुरमा करून खाऊ घालणार

By

Published : Jul 24, 2022, 12:42 PM IST

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने ( Neeraj Chopra ) जागतिक चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला. त्याने 88.13 मीटर फेक करून देशाला रौप्य पदक ( Neeraj Chopra Wins Silver ) मिळवून दिले. भारतासाठी पदक जिंकणारा तो दुसरा खेळाडू आहे. त्यांच्या विजयानंतर कुटुंबियांमध्ये ( Neeraj Chopra Family ) आनंदाचे वातावरण आहे.

neeraj chopra
neeraj chopra

पानिपत : नीरज चोप्राने ( Neeraj Chopra ) अमेरिकेतील यूजीन येथे सुरू असलेल्या 18व्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकच्या अंतिम फेरीत रौप्य पदक जिंकले. नीरजने जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकच्या अंतिम फेरीत ८८.१३ मीटर भालाफेक करून रौप्य पदक जिंकले. अँडरसन पीटर्सने (90.46 मीटर) भालाफेक करीत करून सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत पदक जिंकणारा नीरज पहिला भारतीय ठरला आहे. यापूर्वी 2003 मध्ये लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्जने जागतिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. त्यांच्या विजयानंतर कुटुंबियांमध्ये ( Neeraj Chopra Family ) आनंदाचे वातावरण आहे.

नीरजच्या कुटुंबियांमध्ये जल्लोष

नीरजने जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकच्या अंतिम फेरीत भारताला रौप्यपदक ( Neeraj Chopra Wins Silver ) मिळवून देत 19 वर्षांनंतरचा पदकांचा दुष्काळ संपवला. नीरजने रौप्यपदक जिंकताच पानिपतमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. नीरजच्या या यशावर त्याचे कुटुंबीय आणि गावकरी नाचत आनंद साजरा करत आहेत. लोकांना लाडू देऊन त्यांचे तोंड गोड केले जात आहेत. खंडारा गावात सकाळी सामना सुरू होताच गावातील प्रत्येक माणूस एलईडीवर सामना बघताना दिसत होता. उपायुक्त सुशील सरवन यांनीही घटनास्थळी पोहोचून आनंदोत्सवात सहभाग घेतला. नीरजने फायनल भाला फेकल्याबरोबर नीरज नव्हे तर उपस्थित प्रत्येक व्यक्ती भाला फेकत आहे असे वाटले.

काय म्हणाले नीरजचे वडील - नीरजचे वडील सतीश कुमार यांनी आपल्या मुलाच्या या यशाचा आनंद साजरा करताना सांगितले की, त्यांना देशासाठी अजून सोने आणायचे आहे. 2003 मध्ये अंजू बॉबी जॉर्जनंतर जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी पदक जिंकणारा नीरज हा दुसरा खेळाडू ठरला आहे. जॉर्जने लांब उडीत भारताला कांस्यपदक मिळवून दिले.

काय म्हणालीआई -नीरजची आई सरोज देवी म्हणाल्या की, त्या खूप आनंदी आहेत. 15 दिवसांपूर्वी माझ्या मुलाशी बोलले. त्या काळात तो कठोर परिश्रमात गुंतले होता. त्या कष्टाचे फळ आता मुलाला मिळाले. या स्पर्धेत तो पदक जिंकेल याची आम्हाला खात्री होती. मग ते सुवर्णपदक असो वा रौप्य पदक. त्याचा खूप आनंद आहे. मुलाच्या विजयाने नीरज चोप्राची आई सरोज देवी म्हणाली की, ती अमेरिकेतून परतल्यानंतर आपल्या मुलाची आवडती डिश चुरमा खायला देईल. नीरजचे वडीलही आपल्या मुलाच्या पदकाने खूप खूश आहेत. विशेष म्हणजे नीरजने ८८.१३ मीटर फेक करून रौप्यपदकावर कब्जा केला आहे.

मुलाच्या लग्नावर काय म्हणाले आईवडील -नीरजच्या वडिलांना त्याच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, आता ऑलिम्पिकनंतर सर्व गोष्टींचा विचार करायचा आहे, त्याआधी तसे काही नाही. त्याच्या मुलाचे पुढचे ध्येय ऑलिम्पिक हे आहे. त्यानंतर काय करायचे आणि कसे करायचे ते पाहिले जाईल. दुसरीकडे, नीरजची आई सरोज देवी यांनी मुलाच्या लग्नाबाबत सांगितले की, मुलाच्या लग्नाचा अद्याप कोणताही विचार केलेला नाही. सध्या त्याचे खेळावरच लक्ष केंद्रीत आहे.

उपायुक्त म्हणाले, नीरजने पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले - देशाच्या सुपुत्राने पुन्हा देशाचे नाव कमावले आहे. नीरज चोप्राने आज रौप्य पदक जिंकून पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित केले. देशाला त्यांचा अभिमान आहे. नीरज चोप्रा हा भारतातील सर्वोत्तम क्रीडा व्यक्ती आहे. माझ्या मित्राच्या मुलाने देशाचा गौरव केला आहे, याचा मला अभिमान आहे. भविष्यातही त्यांनी राष्ट्रकुलमध्ये चांगली कामगिरी करावी, अशीही माझी इच्छा आहे.

हेही वाचा -Neeraj Statement After Winning Medal : देशासाठी पदक जिंकणे अभिमानाची बाब - नीरज चोप्राने देशवासियांचे मानले आभार

ABOUT THE AUTHOR

...view details