महाराष्ट्र

maharashtra

NDA Meeting : NDA च्या बैठकीत एकनाथ शिंदे, अजित पवारांना पहिल्या रांगेत स्थान, मोदींनी सांगितला NDA चा नवा अर्थ

By

Published : Jul 18, 2023, 10:17 PM IST

विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सत्ताधारी एनडीएची बैठक झाली. या बैठकीत एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह अनेक पक्षांचे नेते सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, ग्रुप फोटो दरम्यान अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना भाजपच्या इतर बड्या नेत्यांसोबत पहिल्या रांगेत स्थान मिळाले होते.

NDA Meeting
एनडीएची बैठक

नवी दिल्ली : दिल्लीतील अशोक हॉटेलमध्ये मंगळवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एनडीएची बैठक पार पडली. या बैठकीला संबोधित करताना मोदी म्हणाले की, 'एनडीए हा अटलजींचा वारसा आहे. लालकृष्ण अडवाणी यांनीही त्याला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली'. ते म्हणाले की, 'हीच ती वेळ आहे जेव्हा देश येत्या 25 वर्षांत आपले ध्येय साध्य करण्यासाठी पावले उचलत आहे. हे ध्येय विकसित आणि आत्मनिर्भर भारताचे आहे', असे मोदी म्हणाले.

'आम्ही कधीही नकारात्मक राजकारण केले नाही' : नरेंद्र मोदी म्हणाले की, आम्ही विरोधी पक्षात असतानाही सकारात्मक राजकारण केले. आम्ही कधीही नकारात्मक राजकारण केले नाही. विरोधी पक्षात राहून आम्ही सरकारांना विरोध केला, त्यांचे घोटाळे चव्हाट्यावर आणले, मात्र जनादेशाचा अपमान केला नाही, परकीय शक्तींची मदत घेतली नाही. ते म्हणाले की, NDA म्हणजे N - नवा भारत (New India), D - प्रगती (Development), A - आकांक्षा (Aspirations). आज तरुण, महिला, मध्यमवर्ग, दलित आणि वंचितांचा एनडीएवर विश्वास आहे, असेही मोदी म्हणाले.

'एनडीए काळाच्या कसोटीवर उतरली' : नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, 'जेव्हा सत्तेच्या मजबुरीमुळे आणि भ्रष्टाचाराच्या इराद्याने युती केली जाते, जेव्हा युती कुटुंबवादाच्या धोरणावर आधारित असते, जेव्हा जातीयवाद, प्रादेशिकता डोळ्यासमोर ठेवून युती केली जाते, तेव्हा त्या युतीमुळे देशाचे खूप नुकसान होते. ही बैठक बंगळुरूमधील विरोधी पक्षांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आली. याकडे सत्ताधारी पक्षाचे शक्तीप्रदर्शन म्हणून देखील पाहिले जात आहे. बैठकीपूर्वी पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, केंद्रातील सत्ताधारी युती काळाच्या कसोटीवर उतरली आहे. ही युती राष्ट्रीय प्रगती आणि प्रादेशिक आकांक्षा पूर्ण करू इच्छित आहे.

अजित पवार, एकनाथ शिंदेंना पुढच्या रांगेत स्थान : जेव्हा लोजप नेते आणि रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांनी मोदींच्या पायाला स्पर्श केला तेव्हा पंतप्रधानांनी त्यांना मिठी मारली. ग्रुप फोटो दरम्यान राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार, एकनाथ शिंदे, पलानीस्वामी हे पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत पुढच्या रांगेत उभे होते.

मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिलीच बैठक : सभेच्या ठिकाणी पोहोचलेल्या भाजप तसेच मित्रपक्षांच्या नेत्यांचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्वागत केले. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीची अशा प्रकारची ही पहिलीच बैठक आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सामोरे जाण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येत असताना सत्ताधारी पक्षानेही आपली युती मजबूत करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे.

हेही वाचा :

  1. INDIA VS NDA : 'दम असेल तर INDIA ला चॅलेंज करा!', विरोधी पक्षाच्या बैठकीनंतर कोण काय बोललं जाणून घ्या..
  2. INDIA VS NDA : विरोधी आघाडीत मतभेद, तर एनडीएतही कुरबुरी; कोणाचे किती बलाबल?
  3. Opposition Meeting : विरोधी आघाडीचे नाव ठरले, 2024 मध्ये 'INDIA' विरुद्ध 'NDA' सामना रंगणार

ABOUT THE AUTHOR

...view details