महाराष्ट्र

maharashtra

Mirage 2000 : 'शत्रू विनाशक' मिराज २००० लढाऊ विमान.. जाणून घ्या वैशिष्ट्ये अन् किंमत..

By

Published : Jan 28, 2023, 3:37 PM IST

मिराज 2000 विमान मध्य प्रदेशातील मुरैनाजवळ आज कोसळले. या अपघातात सुखोई-३० या दुसऱ्या लढाऊ विमानाचाही अपघात झाला आहे. अपघात झालेले मिराज २००० विमान म्हणजे वायुसेनेचे खास लढाऊ विमान आहे. पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर हल्ला करणाऱ्या मिराज 2000 च्या वैशिष्ट्यांबद्दल आपण जाणून घेऊयात.

Mirage 2000 Fighter Plane Features and specialty
'शत्रू विनाशक' मिराज २००० लढाऊ विमान.. जाणून घ्या वैशिष्ट्ये अन् किंमत..

नवी दिल्ली: कारगिल युद्ध असो वा सर्जिकल स्ट्राइक २.०, पाकिस्तानात आश्रय घेणाऱ्या दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देणाऱ्या विमानांमधील एक असलेले भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान मिराज-२००० हे शुक्रवारी मध्य प्रदेशातील मुरैना येथे कोसळले. रडारच्या रेंजमध्ये न येणाऱ्या या फायटर प्लेनची खास गोष्ट म्हणजे ते कोणत्याही देशाच्या सीमेच्या आत जाऊन शत्रूंचा नाश करू शकते. अत्यंत अचूकतेने रेंजच्या आत निशाणा साधून आपले लक्ष्य नष्ट करण्याची ताकद त्यात आहे. हवेतून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र आहे. यासोबतच ते हवेतून पृष्ठभागावर मारा करणारी क्षेपणास्त्रेही हाताळू शकते.

चौथ्या पिढीचे मल्टीरोल लढाऊ विमान:1970 मध्ये पहिल्यांदा उड्डाण केलेले मिराज-2000 हे अत्याधुनिक लढाऊ विमानांच्या श्रेणीत येते. या विमानाला भारतीय हवाई दलाने वज्र असे नाव दिले आहे. हे विमान राफेल लढाऊ विमान बनवणाऱ्या फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हिएशन कंपनीने तयार केले आहे. मिराज-2000 या लढाऊ विमानाची लांबी 47 फूट आणि वजन 7,500 किलो असून, ते ताशी दोन हजार किमी वेगाने उड्डाण करू शकते.

मिराज २००० ला आहे डबल इंजिन:मिराज-2000 हे 13,800 किलो दारूगोळा घेऊन 2,336 किमी वेगाने उड्डाण करू शकते. डबल इंजिन असलेले मिराज-2000 विमान प्रति मिनिट 125 राउंड आणि 68 मिमी प्रति मिनिट 18 रॉकेट फायर करते. हे चौथ्या पिढीचे मल्टीरोल लढाऊ विमान आणि मॅच २ प्रकारातील विमान आहे. मिराज 2000 ची किंमत 161 कोटी रुपये म्हणजे $23 दशलक्ष आहे. फ्रान्सने हे विमान केवळ भारतालाच विकले नाही, तर आजपर्यंत नऊ देशांच्या हवाई दलाकडून हे विमान वापरले जात आहे.

१९८६ पासून भारतीय हवाई दलात:ऑक्टोबर 1982 मध्ये, भारताने 36 सिंगल सीटर सिलेंडर मिराज 2000 आणि 4 ट्विन सीटर मिराज 2000 ची ऑर्डर दिली. 1986 मध्ये ते औपचारिकपणे हवाई दलात सामील झाले. कारगिल युद्धात मिग-21 सोबत मिराज-2000 विमानांनीही महत्त्वाची भूमिका बजावली होती. 2015 मध्ये, कंपनीने अपग्रेडेड मिराज-2000 लढाऊ विमान भारतीय हवाई दलाला सुपूर्द केले. या अपग्रेड केलेल्या विमानांमध्ये नवीन रडार आणि इलेक्ट्रॉनिक यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत, त्यामुळे या विमानांच्या वेग आणि अचूक लक्ष घेण्याच्या क्षमतेत मोठी वाढ झाली आहे.

हेही वाचा: IAF Fighter Jets Crashed वायूसेनेच्या दोन विमानांचा अपघात एक मध्यप्रदेशात तर दुसरे पडले राजस्थानात एक वैमानिक ठार

ABOUT THE AUTHOR

...view details