महाराष्ट्र

maharashtra

मिलिंद देवरांच्या राजीनाम्याबाबत काँग्रेसचा थेट पंतप्रधान मोदींवर आरोप, 'हा' केला मोठा दावा

By PTI

Published : Jan 14, 2024, 1:27 PM IST

Jairam Ramesh on Milind Deora : काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस पक्षाकडून पंतप्रधान मोदींवर मोठा आरोप करण्यात आलाय. मिलिंद देवरा यांचा राजीनामा जाहीर करण्याची वेळ पंतप्रधान मोदी यांनी निश्चित केल्याचा आरोप काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी केला.

Jairam Ramesh on Milind Deora
Jairam Ramesh on Milind Deora

नवी दिल्ली Jairam Ramesh on Milind Deora : 'भारत जोडो न्याय यात्रा' सुरू होण्याच्या काही तासांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी पक्षाचा राजीनामा दिलाय. या राजीनामाच्या घोषणेची वेळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवली होती, अशी टीका कॉंग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केलीय. गेल्या शुक्रवारीच देवरा यांच्याशी फोनवर चर्चा झाली होती आणि त्यांना पक्षाचे नेते राहुल गांधी यांना भेटायचं होतं. ते त्यांच्या पूर्वीच्या लोकसभा जागेसाठी (दक्षिण मुंबई) आग्रही होते, असंही कॉंग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटलंय. सध्या शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे दक्षिण मुंबईचे खासदार आहेत.

राजीनाम्याची वेळ मोदींनी ठरवली : जयराम रमेश यांनी आरोप केला की, "मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्याच्या घोषणेची वेळ स्पष्टपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठरवलीय. देवरांनी मला शुक्रवारी सकाळी 8:52 वाजता मेसेज केला. त्याच दिवशी दुपारी 2:47 वाजता मी उत्तर दिलं. त्यांना विचारलं, तुम्ही पक्ष सोडण्याचा विचार करत आहात का? मग दुपारी 2.48 वाजता त्यांनी मेसेज केला की मी तुमच्याशी बोलू का? मी त्यांना सांगितलं की, मी तुम्हाला कॉल करेन. त्याच दिवशी मी त्यांच्याशी 3:40 वाजता बोललो."

दक्षिण मुंबईच्या जागेसाठी देवरा आग्रही : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम म्हणाले, देवरांनी मला सांगितलं की ही दक्षिण मुंबईची जागा शिवसेना ठाकरे गटाची आहे. या जागेसाठी ते आग्रही आहेत. त्यांना राहुल गांधींना भेटून या जागेबद्दल सांगायचं आहे. याबाबत मी राहुल गांधींशी बोलावं, अशी त्यांची इच्छा होती, असंही जयराम रमेश म्हणाले. देवरांना उद्देशून रमेश यांनी एक्सवर (पुर्वीचं ट्विटर) एक पोस्ट केलीय. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, "मुरली देवरा (मिलिंदचे दिवंगत वडील) यांच्यासोबतचा माझा दीर्घकाळचा संबंध मला आठवतो. सर्व राजकीय पक्षांमध्ये त्यांचे जिवलग मित्र होते, पण ते कट्टर काँग्रेसवासी होते. ते प्रत्येक कठीण प्रसंगात काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहिले. तथास्तू!"

हेही वाचा :

  1. 27व्या वर्षी खासदार झालेले मिलिंद देवरा काँग्रेसला सोडून आज शिंदे गटात करणार प्रवेश, कसा राहिला राजकीय प्रवास?
  2. मिलिंद देवरांनी काँग्रेसला दाखवला 'हात'; नाना पटोलेंची सरकारवर टीका

ABOUT THE AUTHOR

...view details