महाराष्ट्र

maharashtra

'तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे हात-पाय तोडून थेट स्मशानात पाठवू'

By

Published : Nov 9, 2020, 10:57 AM IST

येत्या सहा महिन्यात तृणमुल काँग्रेसचे कार्यकर्ते सुधारले नाहीत, तर त्यांचे हात-पाय तोडू आणि त्यांना रुग्णालयात नाही, तर स्मशानात पाठवू, असे वादग्रस्त वक्तव्य पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केले आहे. तर दिलीप घोष हे राज्यातील राजकीय वातावरण बिघडवत आहेत, असा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे.

दिलीप घोष
दिलीप घोष

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एका सभेला संबोधीत करताना, त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना धमकी दिली. जर येत्या सहा महिन्यात तृणमुल काँग्रेसचे कार्यकर्ते सुधारले नाहीत तर त्यांचे हात-पाय तोडू आणि त्यांना रुग्णालयात नाही, तर स्मशनात पाठवू, असे वक्तव्य दिलीप घोष यांनी केले आहे. जर आम्ही सत्तेत आलो, तर पुन्हा राज्यात लोकशाही प्रस्थापित करू, असे ते म्हणाले.

घोष यांची दिली धमकी

केंद्र सरकार तुमच्यासोबत असून राज्यात स्वतंत्र आणि निपक्ष विधानसभा निवडणूक पार पडतील, हे केंद्र सरकार सुनिश्चित करेल. विधानसभा निवडणूक राज्यातील पोलिसांच्या नाही, तर केंद्रीय सुरक्षा दलाच्या देखरेखीखाली होतील. तसेच येत्या काही दिवसात जर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या खोडी सुधारल्या नाहीत तर त्यांना आम्ही स्मशानभूमीत पाठवू, असे दिलीप घोष म्हणाले. तथापि, दिलीप घोष हे राज्यातील राजकीय वातावरण बिघडवत आहेत, असा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे.

एप्रिलमध्ये विधानसभा निवडणूका

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांना अजून अवधी असतानाच भारतीय जनता पक्षाने निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. राज्यात आगामी वर्षात एप्रिल महिन्यात विधानसभा निवडणुका होऊ शकतात. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भाजपकडून तगडं आव्हान उभं करण्यात येत आहे.

हेही वाचा -दिवाळी गिफ्ट! पश्चिम बंगालमध्ये 11 नोव्हेंबरपासून उपनगरीय रेल्वे सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details