महाराष्ट्र

maharashtra

कन्हैया कुमारांसह जिग्नेश मेवानी यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

By

Published : Sep 28, 2021, 5:48 PM IST

कन्हैया कुमारांसह जिग्नेश मेवानी यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश
कन्हैया कुमारांसह जिग्नेश मेवानी यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

काँग्रेसमध्ये दोन मोठ्या नेत्यांनी प्रवेश केला आहे. अनेक दिवसांपासून हे नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती.

नवी दिल्ली -सीपीआयचे नेता कन्हैया कुमार आणि गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे. नुकतेच कन्हैय्या कुमार यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली होती.

आमदार जिग्नेश मेवानी यांच्यामुळे गुजरातच्या राजकारणाची तर कन्हैया यांच्या बिहारच्या राजकारणाची समीकरणे बदलू शकतात, असे राजकीय विश्लेषकांना वाटते.

कन्हैया कुमारांसह जिग्नेश मेवानी यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

कन्हैयामुळे पक्षाला बिहारमध्ये सावरण्याची संधी मिळेल'

या प्रवेशाबाबत अनेक काँग्रेस नेत्यांना विश्वास वाटतोय, की कन्हैयामुळे पक्षाला बिहारमध्ये सावरण्याची संधी मिळेल. बिहारमध्ये गेल्या तीन दशकांपासून काँग्रेस काही खास काम करू शकली नाही. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत, मित्रपक्ष आरजेडी आणि सीपीआयच्या (एमएल) तुलनेत काँग्रेसच्या जागा फारच कमी आल्या. काँग्रेसने लढवलेल्या ७० पैकी केवळ १९ जागा जिंकल्या. आरजेडीने १४४ जागांपैकी अर्ध्याहून अधिक जागा जिंकल्या, तर सीपीआयने (एमएल) १९ पैकी १२ जागा जिंकल्या जिथे त्यांनी उमेदवार उभे केले होते.

हेही वाचा-मोदी सरकार देशाचे चौकीदार नसून भांडवलदारांचे रखवालदार - कन्हैया कुमार

'कन्हैया कुमार पक्षावर कमालीचे नाराज असल्याचे समोर आले'

काही दिवसांपुर्वी हैदराबाद येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत कन्हैया कुमार यांच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षानेच (सीपीआय) निषेध केला होता. त्यानंतर कन्हैया कुमार पक्षावर कमालीचे नाराज असल्याचे समोर आले आहे. तसेच, आपल्याला पक्षातील ज्येष्ठ नेत्यांमुळे जी पाहीजे ती जागा मिळत नाही. किंबहून आपली घुसमट होत आहे अशी भावना कन्हैया यांची असल्यामुळे ते पक्षातून बाहेर पडण्याच्या मानसिकतेत होते.

हेही वाचा-कन्हैया कुमार लवकरच काँग्रेसमध्ये?, राहुल गांधी यांची घेतली भेट

अशी आहे गुजरातमधील राजकीय स्थिती

भुपेंद्र पटेल यांच्यासाठी पुढील 14 महिने हे महत्वाचे असणार आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीला फक्त 14 महिने शिल्लक आहेत. निवडणूक डिसेंबर 2022 मध्ये होणार आहे. यात भाजपला विजय मिळवून देण्यासाठी भूपेंद्र पटेल यांना पाटीदारातील दोन्ही कुळ म्हणजेच, कडवा आणि लेउवा पटेल यांची मुठ बांधावी लागेल. काही महत्वाची पावले उचलावी लागेल, जेणेकरून राज्यातील नागरिक भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. त्याचबरोबर, 2022 मधील निवडूक ही भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वात लढवली जाणार असल्याने ती आव्हानात्मक ठरणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांनी गुजरात विधानसभेच्या सर्व 182 जागा जिंकण्याचे लक्ष ठेवले आहे, त्यामुळे पुढील निवडणूक ही भाजपसाठी आव्हानात्मक असणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details