ETV Bharat / bharat

सीईआयआर पोर्टलच्या माध्यमातून राज्यात सापडले तब्बल १५४२६ गहाळ मोबाईल फोन - STOLEN and MISSING MOBILE PHONES

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 21, 2024, 4:27 PM IST

Updated : May 21, 2024, 4:44 PM IST

STOLEN and MISSING MOBILE PHONES सीईआयआर पोर्टल हे पोर्टल आताच्या काळात मोबाईल गहाळ झालेल्यांच्यासाठी वरदान ठरत आहे. CEIR च्या माध्यमातून राज्यात तब्बल १५४२६ गहाळ झालेले मोबाईल फोन सापडले आहेत. तेलंगाणा पोलिसांनी ही माहिती दिली.

STOLEN and MISSING MOBILE PHONES
STOLEN and MISSING MOBILE PHONES (File image)

हैदराबाद STOLEN and MISSING MOBILE PHONES : तेलंगणा राज्य पोलिसांनी 19 एप्रिल 2023 रोजी CEIR पोर्टल लाँच केल्यापासून 30,049 मोबाईल फोन यशस्वीरित्या जप्त केली आहेत आणि ते देशात राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण 15426 मोबाईल या पोर्टलच्या माध्यमातून सापडले आहेत. यामुळे आता जर मोबाईल गहाळ झाला तरी त्याचा अयएमईआय नंबर असेल तर असा फोन नक्कीच सापडतो.

CEIR पोर्टल हे दूरसंचार विभाग (DoT) ने मोबाईल चोरी आणि बनावट मोबाईल उपकरणांच्या धोक्याला आळा घालण्यासाठी विकसित केलं होतं. CEIR पोर्टल 17 मे 2023 रोजी देशभरात अधिकृतपणे सुरू करण्यात आलं होतं. त्यानंतर 19 एप्रिल 2023 पासून तेलंगणा राज्यात प्रायोगिक तत्त्वावर ते सुरू करण्यात आलं होतं.

तेलंगणा राज्यात अतिरिक्त डीजीपी, सीआयडी यांना सीईआयआर पोर्टलसाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केलं आहे. ते सुपर वापरकर्ता देखील आहेत. CEIR पोर्टल तेलंगणा राज्यातील पोलीस युनिट्सच्या सर्व 780 पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत आहे. तत्कालीन एडीजी सीआयडी महेश भागवत हे त्याचे पहिले राज्यस्तरीय नोडल अधिकारी होते. त्यांनी राज्यात आणि बाहेरही मोबाईल रिकव्हरी सुव्यवस्थित केली. सध्या एडीजीपी, सीआयडी श्रीमती. शिखा गोयल, या CEIR पोर्टल अंतर्गत कामाच्या प्रगतीवर लक्ष ठेवतात. या पोर्टलच्या माध्यमातून तेलंगाणामध्ये 30049 हरवलेले/चोरी झालेले मोबाईल डिव्हाइस जप्त केले. त्यापैकी शेवटचे 1000 मोबाईल हे फक्त 9 दिवसांत परत मिळाले आणि तक्रारदारांना ते सुपूर्द केले. तेलंगाणा राज्यात दररोज सरासरी ७६ मोबाईल या पोर्टलच्या माध्यमातून जप्त केले जातात.

ही प्रणाली जेव्हा सुरू झाली त्यावेळी ही यंत्रणा नेमकी कशी चालणार याला कितपत यश येणार असे प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र सीईआयआर ही प्रणाली ज्या पद्धतीनं काम करते त्यावरुन ती किती उपयुक्त आहे, हे आता स्पष्ट होत आहे. या माध्यमातून जप्त केलेल्या मोबाईलची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तेलंगाणात पहिल्या 100 दिवसात 4489 मोबाईल जप्त करण्यात आले. त्यानंतर 200 दिवसात ही संख्या 11203 वर गेली एक वर्षानंतर म्हणजेच 365 दिवसांत 26,833 मोबाईल जप्त करण्यात आले. तर 396 दिवसांनी ही संख्या 30,049 वर गेली.

mobile recovery
Infogfx (ETV Bharat GFX)

तेलंगाणा राज्यात हैदराबाद आयुक्तालयानं 4869 मोबाईल रिकव्हरीसह सर्वात चांगली कामगिरी केली आहे. त्यानंतर सायबराबाद आयुक्तालयाने 3078 आणि रचकोंडा आयुक्तालय 3042 मोबाइल जप्त करण्यात यशस्वी झाले. त्यानंतर वारंगल आयुक्तालय 1919, निजामाबाद 1556 मोबाईल रिकव्हर करण्यात आले. मोबाईलची राज्यनिहाय रिकव्हरी पाहिली तर, कर्नाटक 35945, तेलंगणा 30049, महाराष्ट्र 15426, आंध्र प्रदेश 7387 अशी आकडेवारी आहे.

mobile recovery
Infogfx (ETV Bharat GFX)

मोबाईल वापरणाऱ्यांना त्यांची तक्रार आणि रिकव्हरी व्यवस्थित व्हावी यासाठी तेलंगणातील नागरिकांना अधिक कार्यक्षमतेने सेवा देण्यासाठी तेलंगणा पोलिसांनी दूरसंचार विभागाच्या समन्वयाने TS पोलीस नागरिक पोर्टलसह CEIR पोर्टल यशस्वीरित्या एकत्रित केलं आहे. नागरिकांना विनंती करण्यात आली आहे की, त्यांनी TS पोलीस सिटिझन पोर्टलवर या सेवेचा वापर करून हरवलेल्या/गहाळ झालेल्या मोबाईलची तक्रार नोंदवावी.

या संपूर्ण प्रणालीवर डॉ. लावण्य एनजेपी, एसपी, सायबर क्राईम, सीआयडी, टी.एस. हैदराबाद, हेमंत राठवे, डीडीजी सुरक्षा, एम अरविंद कुमार, संचालक सुरक्षा, लक्ष्मण कुमार के, सहाय्यक संचालक (सुरक्षा लेखापरीक्षा) आणि सुरेश बाबू, आयटी सेलचे निरीक्षक, सीआयडी हे राज्यात सीईआयआर अर्जाच्या अंमलबजावणीवर देखरेख करत आहेत.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे राज्याचे तत्कालीन सीआयडीचे प्रमुख महेश भागवत यांच्या नेतृत्वाखाली ही प्रणाली सुरू झाली होती. 13 महिन्यांच्या कालावधीत 30,000 मोबाईल फोन यशस्वीरित्या रिकव्हर केले होते. आता या संपूर्ण कामगिरीबद्दल महेश भागवत यांनी SP सायबर क्राईम आणि टीमचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा..

  1. तुमचा फोन हरवला? काळजी करू नका; तुम्ही तुमचा हरवलेला फोन ट्रॅक करू शकता - Block Stolen Phone
  2. Aadhar News: तुमच्या नावानं कोणी मोबाईल क्रमांक घेतलाय का? सोप्या पद्धतीनं टाळा आधारचा गैरवापर
Last Updated : May 21, 2024, 4:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.